26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूरनिलंगा तालुक्यात कृषि विभागाकडून पीक पाहणी

निलंगा तालुक्यात कृषि विभागाकडून पीक पाहणी

एकमत ऑनलाईन

निलंगा : कृषि विभाग महाराष्ट्र शासन व वंसतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठ,परभणी यांच्या संयुक्त पथकाने निलंगा तालुक्यातील केळगाव, लांबोटा येथील शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष तूर पिकावरील व खोडावरील करपा रोगाची पहाणी करीत्ां प्रक्षेत्रास प्रत्यक्ष भेट देऊन शेतक-याना मार्गदर्शन केले.

यावर्षी अधिकच्या पांवसाचा विविध पिकांना फटका बसला आहे. खरिपातील सर्वात शेवटी येणारे जास्त कालावधी लागणारे तुरीचे पीक बहरलेले असताना तालुक्यातील अनेक गावांत अचानक तूर मोठ्या प्रमाणावर वाळत असल्याने ऐन बहरातील पिकावर हे नवे संकट उभारले आहे. यावर सध्या तरी कोणता उपाय नसून पीक पद्धतीत पुढील वर्षी बदल करावा लागणार असून मागे पडलेल्या अधिकच्या पावसाने वावरात पाणी साठून ते त्यात मुरले व बुरशी वाढून आता त्याचा हा परिणाम होत असल्याचे उपविभागीय कृषिअधिकारी राजेद्रं कदम यांनी सांगितले. त्यांनी तालुक्यातील केळगाव लांबोटा शिवारात भेटी देऊन तुरीच्या पिकाची पाहणी करुन शेतक-यांशी संवाद साधला असून याबाबतच्या नुकसानीबाबतचा अहवाल वरिष्ठांना कळवणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी ए.पी.सूर्यवंशी वनस्पती रोग शास्त्रज्ञ तथा प्राचार्य कृषि सहविद्यालय लातूर, तालुका कृषिअधिकारी राजेद्रं कदम, मंडळ कृषिअधिकारी रणजीत राठोड, कृषिसहाय्यक एस एल सोनकांबळे, कृषिसहाय्यक गोसावी, शेतकरी सुधाकर जाधव, बालाजी काळे, गोंिवद काळे, कृष्णा काळे उपस्थितीत होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या