27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरनिवळी जिल्हा परिषद शाळेत वृक्ष लागवड

निवळी जिल्हा परिषद शाळेत वृक्ष लागवड

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील निवळी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन अण्णासाहेब रामकृष्ण शिंदे यांनी केले होते. कार्यक्रमास विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे व वृक्ष प्रेमी सुपर्ण जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी प्रारंभी वृक्ष लागवड करण्यात आली. तर सुपर्ण जगताप यांनी वृक्ष चळवळ व झाडाविषयी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे यांनी उपक्रमाचे कौतूक केले.
या शाळेसाठी सन २०१४ साली विलास सहकारी साखर कारखाना यांनी शाळेस ठिबक संच दिला होता. आज ही वापरला जात आहे. शाळेमध्ये लावलेल्या रोपट्यांचे आज वटवृक्ष झाला आहे अशी माहिती शाळेकडून देण्यात आली.

कार्यक्रमास डॉ. पलंगे, अंगद जाधव, शरद झरे, हमीद शेख, अमोल इंगळे, अ‍ॅड. सुनील गायकवाड, मुख्याध्यापक गंगणे, युवराज जाधव, सर्व शिक्षक आणि शिक्षिका तसेच गावातील पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन चव्हाण यांनी केले तर आभार अण्णासाहेब शिंदे यांनी मानले. युपीएसी परीक्षेतील गुणवंत शूभम स्वामी यांच्या आई श्रीमती व्ही. बी. स्वामी जिल्हा परीषद शाळा, निवळी येथे सहशिक्षीका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यांचा मुलगा शूभम स्वामी याने युपीएसी परीक्षेत मिळवीलेल्या यशा बद्दल कौतूक करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या