निलंगा : कर्नाटक सिमा भागातील हुलसुर तालुक्यातील ग्रामीण भागातील कोटमाळ येथील औराद शहाजानी येथील रहिवासी असलेले सुरज बालाजीराव शिंदे यांची भारतीय नौदलाच्या सबलेफ्टनंट पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे .
सुरज शिंंदेचे प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र विद्यालय निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे तर पाचवी ते बारावी विकास काँन्सेप्ट स्कुल हैद्राबाद येथे झाले आहे. सन २०१८ साली युपीएससी मार्फत लष्करात अधिकारी पदी निवड होण्यासाठीची एन डि ए परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर २०१८ ते २०२२ सदन कमांड कोची केरळ येथे खडतर प्रशिक्षण एप्रिल महिन्यात पूर्ण केले नुकताच कोची येथे दीक्षांत समारंभ पार पडला असून भारतीय नौदलात सब लेफ्टनंट म्हणून मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे
सुरज च्या निवडीबद्दल काँग्रेसचे जेष्ठ नेते मोहनराव भंडार, इंजि विनायक बगदुरे, चेअरमन लक्ष्मण बोंडगे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव भंडारे, मडोळया मठपती, राजा पाटील, व्यंकट पाटील , बस्वराज वलांडे, जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रामदास भोसले सचिव अरुन सोमाणी जिल्हा उपाध्यक्ष ओम बाहेती, निलंगा तालुकाध्यक्ष बालाजी थेटे, कोषाध्यक्ष अरुन गडीकर, डॉ डी एस कदम, डॉ वाय व्ही चिद्रेवार, डॉ मल्लिकार्जुन शंकद, प्राचार्य वसंत पाटील, तानाजी सुर्यवंशी, विक्रम पाटील , शालिवान शिंदे, डाँ मनोज कदम, डाँ अभिजीत लोखंडे, अॅड अशोकराव शिंदे , भिकाजीराव शिंदे, भीमराव शिंदे, राम शिंदे, डॉ मोहन शिंदे, महादेव इंगळे, लक्ष्मण पाटील, राम रेड्डी , माधव खामकर, व्यंकट शिंदे, सत्यवान शिंदे , विठ्ठल शिंदे, मधुकर शिंदे, कुमार शिंदे , मारुती शिंदे आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या