औसा : प्रतिनिधी
औसा तालुक्यातील चलबुर्गा गावची भूमिकन्या शुभाली लक्ष्मीकांत परिहार या विद्यार्र्थीनीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ४७३ वी रँक मिळवून उज्वल यश संपादन करीत औसा तालुक्याचा लौकिक देशभरात वाढविला असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी केले. चलबुर्गा येथे शुभाली परीहार व जावाई चंद्रशेखर परदेशी यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. स्पर्धा परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक तसेच, वडील प्राध्यापक लक्ष्मीकांत परिहार आणि पती चंद्रशेखर परदेशी यांची खंबीर साथ यामुळेच आपणास हे यश संपादन करता आले, असे शुभाली परीहार यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, प्रा. दत्तात्रय सुरवसे, दत्ता परिहार, प्राचार्य मारुती सूर्यवंशी, दयानंद चव्हाण, लक्ष्मीकांत परिहार, शूभालीचे पती चंद्रशेखरंिसह परदेशी, बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, योगानंद स्वामी, उपसरपंच सौ विजयमाला मोरे, अॅड. बाबुराव मोरे, दावतपूर येथील सरपंच विठ्ठल बेडजवळगे, राहुल मोरे, धर्मेंद्र बिसेन, प्रा. अंकुश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.