29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरपशुधनासाठी कोंडवाडा, पशु रुग्णवाहिकेची व्यवस्था करा

पशुधनासाठी कोंडवाडा, पशु रुग्णवाहिकेची व्यवस्था करा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने गेल्या एक ते दीड वर्षांपासून मोकाट कुत्र्यांची नसबंदी, मोकाट गाईंसाठी कोंडवाडा, तसेच पशु रुग्णवाहिकेची व्यवस्था करावी, अशी मागणी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

लातूर शहरातील मोकाट कुत्र्यांची नसबंदी करणे, मोकाट गाईंसाठी कोंडवाडा करणे हे पालिकेचे काम आहे. महानगरपालिकेत पशुवैद्यकीय विभाग पाहिजे. त्यात एक डॉक्टर असणे आवश्यक आहे. पण पालिकेकडे हे काहीच नाही. एक डॉक्टर आहे, पण त्यांची सेवा दिसून येत नाही. पालिकेकडे स्वत:चे हॉस्पिटल, पशु रूग्णवाहीका पाहिजे ती सुध्दा नाही.

मनसेच्या वतीने लातूर महानगरपालिकेला वारंवार निवेदन देऊनही पालिकेने या विषयाकडे कसल्याही प्रकारचे लक्ष दिले नाही. या नंतर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या वेळी मनसे सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे, शहाराध्यक्ष मनोज अभंगे, फुलचंद कावळे, सचिन सिरसाट, धनंजय मुंडे, अनिल जाधव, ज्ञानेश्वर कदम, मुख्तार शेख, तन्वीर शेख हे सर्व उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या