27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरपाझर तलावांचे होणार पुनरुज्जीवन

पाझर तलावांचे होणार पुनरुज्जीवन

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण मतदारसंघातील पाझर तलाव, गॅबियन बंधा-यांच्या पुनरुज्जीवनासाठी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने मुख्यमंत्री जलसंधारण योजनेंतर्गत मतदारसंघातील ४ कोटी ७८ लाख रुपयांच्या आवश्यक दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. या दुरुस्तीच्या कामांमुळेह्यािसंचनक्षमता पुनर्स्थापित होण्यास भरीव मदत होणार आहे.

‘लातूर ग्रामीण’ मधील काही बंधारे व तलाव यात गाळ जमा झाल्याने त्याची खोली कमी होऊन पाणी साठवण क्षमता घटत चालली आहे. शिवाय, गळतीमुळे आणि वेळेवर दुरुस्ती न झाल्यानेही या प्रकल्पातील पाण्याचा फायदा परिसरातील नागरिकांना, शेतक-यांना फारसा होत नव्हता. हे निदर्शनास आल्यानंतर आमदार धीरज देशमुख यांनी तातडीने जलस्रोतांचे पुनरुज्जीवन व्हावे, यासाठी प्रयत्न सुरु केले. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून त्यांनी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना पत्रही पाठवले. याबाबत आमदार धीरज देशमुख यांनी केलेली मागणी मान्य झाल्याने लवकरच ‘लातूर ग्रामीण’ मधील २५ योजनांच्या दुरुस्तीची कामे होणार आहेत.

रेणापूर तालुक्यातील गोविंदनगर येथे गाव तलाव दुरुस्तीसाठी ११.४५ लाख, बावची येथे पाझर तलाव २ दुरुस्तीसाठी ३२.५० लाख, आसराचीवाडी येथे पाझर तलाव ५ दुरुस्तीसाठी १२.३५ लाख, निवाडा येथे गाव तलाव दुरुस्तीसाठी ३३.७४ लाख, माकेगाव येथे पाझर तलाव २ दुरुस्तीसाठी ४.८० लाख, कारेपूर येथे पाझर तलाव ९ दुरुस्तीसाठी २०.७५ लाख, समसापूर येथे कंपोझिट गॅबियन बंधारा दुरुस्तीसाठी ५.४२ लाख, दर्जी बोरगाव येथे गॅबियन बंधारा २ दुरुस्तीसाठी १५.९९ लाख तर औसा तालुक्यातील वरवडा येथे पाझर तलाव दुरुस्तीसाठी २१.८८ लाख आणि टाका
बिरवली येथे सिमेंट नाला बांध दुरुस्तीसाठी १०.१७ लाख रुपयांच्या कामांना मान्यता मिळाली आहे.

लातूर तालुक्यातील करकट्टा येथे पाझर तलाव ५ दुरुस्तीसाठी १४.३८ लाख, पाझर तलाव ८ दुरुस्तीसाठी २१.३५ लाख, पाझर तलाव ९ दुरुस्तीसाठी २३.८२ लाख, कासारजवळा येथे पाझर तलाव १ दुरुस्तीसाठी २५.५३ लाख, दगडवाडी येथे गाव तलाव दुरुस्तीसाठी ९.४१, बोरगाव काळे येथे पाझर तलाव १३ दुरुस्तीसाठी ३८.८८ लाख, माटेफळ येथे पाझर तलाव ८ दुरुस्तीसाठी २०.५८ लाख, पाझर तलाव ९ दुरुस्तीसाठी २४.१२ लाख, पाझर तलाव १० दुरुस्तीसाठी ३२.२२ लाख, पाझर तलाव १२ दुरुस्तीसाठी २७.४६ लाख, मुशीराबाद येथे गाव तलाव दुरुस्तीसाठी १८.९५ लाख, सलगरा येथे पाझर तलाव ४ दुरुस्तीसाठी १५.७५ लाख, सलगरा बु येथे पाझर तलाव २ दुरुस्तीसाठी १७.१५ लाख, बोरी येथे गॅबियन बंधारा १ दुरुस्तीसाठी १५.३३ लाख आणि चिखुर्डा येथे गॅबियन बंधारा १ दुरुस्तीसाठी ४.०८ लाख रुपयांच्या कामांना मान्यता मिळाली आहे. याबद्दल पालकमंत्री अमित देशमुख, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि राज्य
सरकारचे आमदार धीरज देशमुख यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या