लातूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार दि. ३१ मार्च रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था, संघटनाचे शिष्टमंडळासह नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन निवेदनाचा स्वीकार करुन संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या.
यावेळी अकाल सेना शिष्टमंडळासोबत पालकमंत्री अमित देशमुख यांनी पाच नंबर चौक येथे शहीद भगतसिंग पूर्णाकृती पुतळा उभारणे बाबत चर्चा केली, खाडगाव येथील शिष्टमंडळासोबत परिसरातील लाईट संदर्भात चर्चा केली आणि लातूर शहरातील प्रभाग तीन मधील करीमनगर नागरिक शिष्टमंडळासोबत मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत चर्चा करुन उपस्थित शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. किरण जाधव, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अॅड. समद पटेल, ट्वेंटीवन शुगर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, शिरुर अनंतपाळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सतेज माने, नगरसेवक पप्पू देशमुख, अविनाश बट्टेवार, ज्ञानोबा साखरे, खाडगावचे उपसरपंच योगेश पाटील, राहुल जाधव, विकास देशमुख, आनंद देशमुख, राजकुमार साळुंके, योगेश्वर स्वामी, राम स्वामी, लातूर शहर काँग्रेसचे अल्पसंख्याक सरचिटणीस असलम चाऊस, सादिक शेख, जुनेद शेख, रिहाना शेख, मैनाबाई पात्रे, कुणाल सरवदे, मेरुनिसा शेख, अकाल सेनाचे संस्थापक अध्यक्ष गुलजितसिंग जुन्नी, विकास कांबळे, शरीफ शेख, भीमाशंकर गाढवे, बालाजी मोहिते, प्रतीक पुकाळे, शिवदयाल बायस, राहुल अंधारे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.