24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeलातूरपाहणीचा फार्स न करता तुरीचे पंचनामे करावेत

पाहणीचा फार्स न करता तुरीचे पंचनामे करावेत

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात मर रोगाने तुरीचा खराटा झाला असून प्रशासनाने पाहणी फार्स न करता तुर पिकाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व विमा मिळवून द्यावा अशी मागणी तुर उत्पादक शेतक-यांतून केली जात आहे.

तुर पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे पिक वाळून जात असून तुरीचे उत्पादन धोक्यात आले आहे.या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने तूर पिकांवरील मर रोगाची कृषी तज्ज्ञ व अधिका-याकडून पाहणी व मार्गदर्शन करण्यात आले. मात्र तुर वाळून खराटा झाल्याने प्रशासनाने आता पाहणीचा फार्स न करता तात्काळ पंचनामे करून शेतक-यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. तालुक्यात यंदा शेतक-यांवर अस्मानी संकट कोसळले असून अतिवृष्टी व पुरामुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीन गेले.आता सर्व भीस्त तूर पिकांवर असताना अति पावसाने जमिनीत जास्त काळ ओलावा राहिल्यामुळे तुरीवर बुरशीची वाढ होवून मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अचानक बहरात आलेली तूर मोठ्या प्रमाणावर वाळत असून तालुक्यातील ४ हजार १३२ हेक्टर क्षेत्रावरील तुरीचे उत्पादन धोक्यात आले असून या संकटाने शतकरी हतबल झाला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या