26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूरपूर्वांचल अजूनही उर्वरित भारताशी समरस झालेला नाही

पूर्वांचल अजूनही उर्वरित भारताशी समरस झालेला नाही

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
अरुणाचल, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड व त्रिपुरा ही राज्य म्हणजे पूर्वांचल म्हणून ओळखला जातो. ७० वर्षानंतरही हा भाग सांस्कृतिकदृष्ट्या उर्वरित भारताशी समरस झालेला नाही. याचा विपरीत परिणाम येथील जनजीवनावर व राष्ट्रीय एकात्मतेवरही होत आहे, अशी खंत पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत संचलित पूर्वांचल मेघालय विद्यार्थी वसतिगृहाचा भूमिपूजन सोहळा रविवार दि. २२ नोव्हेेंबर रोजी झाला. या प्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. आरसीसी क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर व महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरआप्पा बिडवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व विधिवत पूजन करुन या वसतिगृहाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे प्रांत सहकार्यवाह अरुण डंके, जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष एस. आर. कुलकर्णी, जिल्हा संघचालक संजय अग्रवाल, निधी संकलन समिती प्रमुख अभियंते अतुल ठोंबरे, प्रकल्प प्रमुख तथा बांधकाम समितीचे प्रमुख योगेश तोतला यांची प्रमुख उपस्थिती होती.

हा भूमिपूजन सोहळा नसून मातृभूमी पूजन व राष्ट्र पूजन आहे असे डॉ. अशोक कुकडे यांनी प्रारंभीच आपल्या भाषणात स्पष्ट केले. डॉ. कुकडे यांनी पूर्वांचलाचा इतिहास, सद्यस्थिती आणि राजकीय इच्छाशक्ती यावर विस्तृत भाष्य केले. राष्ट्रीयत्वाची भावना वृंिद्धगत करण्यासाठी आणि सामाजिक सलोखा, एकात्मता वाढीस लागण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी आपल्या छोटेखानी भाषणात आपल्यावर बालपणी संघाचे संस्कार झाले असून आपल्या व्यवसायात या संस्काराचा शिस्तीसाठी चांगला उपयोग होत आहे, अशी कबुली त्यांनी दिली .

प्रास्ताविक अतुल ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले. योगेश तोतला यांनी आभार मानले तर सीमा अयाचित यांनी वैयक्तिक पद्य म्हटले. या कार्यक्रमास विनोद कुचेरिया, अजित पाटील कव्हेकर, सुधाकर जोशी, डॉ. विश्वास कुलकर्णी, अनिल अंधोरीकर, रामचंद्र बिलोलीकर, नरेंद्र पाठक, डॉ. मनोज शिरुरे, शांताराम देशमुख, शरदराव कुलकर्णी, निशिकांत कुलकर्णी, गोपाळ कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या