29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरपोलिसांकडून धरपकड ; १३ हल्लेखोर ताब्यात

पोलिसांकडून धरपकड ; १३ हल्लेखोर ताब्यात

एकमत ऑनलाईन

नांदेड:प्रतिनिधी
शहरातील गाडीपुरा परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास शुल्लक कारणावरून एका जमावाने विज पुरवठा बंद करून काही युवकांवर शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला.याच वेळी प्रंचड दगडफेक झाली.यात चार ते पाच जण जखमी झाले.अचानक घडलेल्या या घटनेने भितीपोटी नागरिकांची धावपळ उडाली.या हल्लयात काही दुचाकी,ऑटोरिक्षा व पोलिस वाहनाचे नुकसान झाले.मात्र इतवारा पोलीसांनी अत्यंत जलद कारवाई करून २४ हल्लेखोरांपैकी १३ जणांना ताब्यात घेतले. यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेमुळे रात्रभर तनावाचे वातावरण होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गाडीपुरा परिसरात असलेल्या छोटी दर्गा कॉर्नरवर फिर्यादी मंगेश रमेशराव पुरंदरे यांचे किराणा दुकान आहे.

रात्री १० च्या दरम्यान त्यांचे वडील दुकानावर बसलेले होते. त्यावेळी भोईगल्लीतील दोन युवक विनित विजयसिंह ठाकूर व सोनु संजयसिंह ठाकूर हे दोघे किराणा साहित्य घेण्यासाठी आले. तेंव्हा तेथे थांबलेल्या कॉर्नरवरील जमावातील काहिनीं विनित व सोनुकडे बोट दाखवून हेच दोघे होते असे सांगिताच हा जमाव पळत त्यांच्या दुकानावर आला.यावेळी विज पुरवठा बंद करून काही कळायच्या आत सोनु व विनितवर तलवारी, रॉड, दगड, बेसबॉटस्टिक वापरून हल्ला केला. जमावाने फिर्यादी मंगेश पुरंदरेच्या डोक्यात मारल्याने ते गंभीर जखमी झाले.तर श्यामसिंग जव्हार सिंग हेही गंभीर जखमी झाले. ही माहिती मिळताच इतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्तेपोड, पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके, शेख असद आदींसह मोठा पोलीस फौजफाटा जलद गतीने घटनास्थळी पोहचला.यावेळी शेख इरफान, शेख पुरखान , शेख सोहेल सत्तार, शे. अशफाख खान, स. अलीमोद्दीन सय्यद रहिमोद्दीन, स. माजीद सय्यद इमामोद्दीन, स. असीफ सय्यद नकीम, स. आदील सय्यद माजीद, सय्यद जाकीर सय्यद युसूफ, फेरोज खान सादीक खान, सलमान खान सादीक खान, सरफराज खान सादीक खान, मोहम्मद नासेर हुसेन मोहम्मद जाफर हुसेन, मोहम्मद आदेय हुसेन मुक्तार हुसेन, शाहीर अहेमद नासीर अहेमद, सय्यद इरफान सय्यद नफीस, मोहम्मद इमाम मोहम्मद जाकीर, मोहम्मद अफजल मोहम्मद अनवर, मोहम्मद इमाम हुसेन साब, फेरोज खान सादिक खान, एजाज, पाशा, जुबेर आणि शेख नदीमचा भाऊ असे अशा २४ हल्लेखोरांपैकी १३ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले.या हल्लयात काही दुचाकी,ऑटोरिक्षा व पोलिस वाहनाचे नुकसान झाले.

हल्लयातील जखमींना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर अजित खान फैजुल्लाखान रा. हसन गल्ली गाडीपुरा नांदेड हा सुद्धा यात जखमी झाला असून तो सरकारी दवाखाना हैदराबाद येथे उपचार घेत आहे. या प्रकरणी मंगेश पुरंदरेच्या तक्रारीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात विविध कलमासह महाराष्ट्र पोलीस अधिनियम, साथरोग अधिनियम, शस्त्र अधिनियम आणि फौजदारी सुधारणा कायद्याची कलमे जोडण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांच्याकडे देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या