17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeलातूरपोलिस ठाण्याने दिला फिर्याद घेण्यास नकार

पोलिस ठाण्याने दिला फिर्याद घेण्यास नकार

एकमत ऑनलाईन

निलंगा :तालुक्यातील गुंजरगा येथील तेरणा नदी पात्रावरील उच्चस्तरीय बंधा-याच्या दोन दरवाज्याच्या गेअर बॉक्स मध्ये नटबोल्ट टाकून अज्ञात व्यक्तीने ते जाम केले होते. यामध्ये जलसंपदा विभागाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या संदर्भात येथील औराद शहाजानी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता फिर्यादीत अज्ञात व्यक्तीऐवजी आरोपीचे नाव टाकून मोठे साहेब आल्यानंतर फिर्याद द्या असे सांगत फिर्यादीस परत पाठविले आहे. यानंतर जलसंपदा विभागाने स्पीड पोस्टाने फिर्याद पाठवून दिली. मात्र अद्याप गुन्हा नोंद करण्यात आला नाही.

दि २० व २१ ऑक्टोबर दरम्यान तेरणा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व नदीपात्राशेजारील पाण्याचा प्रवाह वाढला होता. यातच जिल्हाधिका-यांंनी नदीपात्राशेजारील गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. सदर उच्चस्तरीय बॅरेजचे गेट काढणे , सोडणे व देखभाल दुरुस्तीचे काम यू. बी. ढेंगळे या एजन्सीला दिलेले आहे. दि २२ ऑक्टोबर रोजी बॅरेज वरील गार्ड प्रात:विधीस गेल्याची संधी पाहून अज्ञात इसमाने दोन दरवाज्याच्या गिअर बॉक्स मध्ये नटबोल्ट लोखंडी तुकडे टाकून बॅरेजचे दोन्ही दार जाम केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जलसंपदाचे उपविभागीय अभियंता मुळे यांनी तात्काळ यांत्रिक विभागाची टीम बोलावून सदर दुरुस्ती केली. यामध्ये साधारणता तीन लाख रुपयांचे जलसंपदा विभागाचे नुकसान झाले आहे.

याबाबत एजन्सीचे मीथून मदने व जलसंपदा विभागाचे सय्यद येरुळे यांनी येथील औराद येथील पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता फिर्यादीस अज्ञात इसमाऐवजी आरोपीचे नाव टाकून मोठे साहेब आल्यानंतर फिर्याद घेऊन या असे म्हणत चिटबोने या पोलीस कर्मचा-याने परत पाठवले असल्याची माहिती सय्यद यांनी दिली. एखाद्या शासकीय विभागाची फिर्याद नोंदवली जात नसेल तर खाकीचा सद्रक्षणाय: खलनिग्रहणाय: सर्वसामान्यांच्या फिर्यादीचे काय असा नागरिकातून संताप व्यक्त करीत केला जात आहे. शासकीय विभागाची फिर्याद घेतली जात नसेल तर सामान्य नागरिकांच्या फिर्यादीबद्दल प्रशासनाचे काय’ मत असेल याबाबाबत नागरिकात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक नागरिकांचे ‘ मत बदलतील का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे .
याबाबत कार्यकारी अभीयंता रोहित जगताप म्हणाले की शासकीय मालमत्तेच्या नुकसानीची फिर्याद पोलीस प्रशासनाने घेणे अपेक्षित आहे.. दरम्यान औराद शहाजानी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलण्याची तसदी घेतली नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या