27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरप्रतिटन २,२०० रुपयांचा पहिला हप्ता बँकेत वर्ग

प्रतिटन २,२०० रुपयांचा पहिला हप्ता बँकेत वर्ग

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखाना युनिट-२ या कारखान्याचा सन २०२१-२२ गळीत हंगामाची सुरुवात गतीने झाली आहे. या हंगामात गाळप झालेल्या ऊस उत्पादक शेतक-यांच्या ऊसाला विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परिवाराच्या धोरणाप्रमाणे गाळप झालेल्या ऊसाला पहिला हप्ता २ हजार २०० रुपये अदा करण्याचा निर्णय घेण्यात असून ३० नोव्हेेंबरपर्यंत गाळप झालेल्या ऊसााची बिले वर्ग करण्यात आली आहेत.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखाना युनिट-२ मागील आठ वर्षांपासून ऊस उत्पादक शेतक-यांचे व कार्यक्षेत्रातील ऊसाचे प्राधान्याने गाळप करीत आहे. कारखान्याने ख-या अर्थाने शेतक-यांची आर्थिक उन्नती करण्याचा दृष्टीकोन ठेवून माजी मुख्यमंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांचे स्वप्न पुर्ण करण्याचे काम सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन तथा लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

विलास सहकारी साखर कारखाना युनिट-२ चा गळीत हंगाम २०२१-२२ ची सुरुवात गतीने झाली असून हंगामात आजपर्यंत ८७३०२ मे. टन ऊसाचे गाळप झाले असून ९२३४० साखर पोते उत्पादीत झाले आहेत. मराठवाड्यातील सर्वाधिक सरासरी साखर उतारा १०.८२ टक्के असून कारखान्याच्या तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करुन गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक ए. आर. पवार यांनी दिली. तसेच ज्या ऊस उत्पादकांचा ३० नोव्हेंबरअखेर ऊस गाळपास आलेला आहे त्यांनी आपल्या बिलासंदर्भात बँक शाखांशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक ए. आर. पवार व सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या