25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरबळीराजावर घोंगावणारे संकट दूर होऊ दे; बळीराजाला समृद्धी, भरभराटी लाभू दे!

बळीराजावर घोंगावणारे संकट दूर होऊ दे; बळीराजाला समृद्धी, भरभराटी लाभू दे!

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
शेतकरी बांधव आज आर्थिक अडचणीत सापडला आहे. एकामागून एक आलेल्या आस्मानी संकटांमुळे तो खचला आहे. बळीराजावर घोंगावणारी ही संकटे दूर होऊ दे, त्यांना समृध्दी भरभराटी लाभू दे, असे साकडे लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी येथे घातले. बाभळगाव येथे बैल पोळा सण पारंपरिक पद्धतीने, उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात साजरा झाला. विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी कुटुंबियांसमवेत बैलांचे व घरातील इतर पशुधनाचे मनोभावे पूजन केले. गोंडे, झूल, घुंगर माळांनी सजविलेल्या गाई, बैलांना गंध, फुले वाहून आरती केली. पुरण पोळीचा नैवेद्य भरवून ‘हर हर महादेव…’असा जयघोष केला.

आपल्यासोबत शेतात राबणा-या, खांद्याला खांदा लावून सदैव साथ देणा-या या सवंगड्याप्रती त्यांनी मनोमन कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचे ऋण व्यक्त केले. दरम्यान, मारुती मंदिरापासून वाजतगाजत निघालेल्या मिरवणुकीत आमदार धिरज देशमुख यांच्यासोबत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी संतोष देशमुख, मुक्ताराम पिटले, गोविंद देशमुख, महादेव जटाळ, नवनाथ म्हस्के, अविनाश देशमुख, भीमा श्.िांदे, गोपाळ थडकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या