22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeलातूरभारतीय संविधान दिन साजरा

भारतीय संविधान दिन साजरा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
भारतीय संविधान दिनानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर शहर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. बार्शी रोडवरील सविधान चौकातून संविधान दिन व जनजागरण अभियान रॅली काढण्यात आली.

या रॅलीचे उद्घाटन काँग्रेसचे लातूर शहराचे प्रभारी व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. जितेंद्र देहाडे, महाराष्ट्र प्रदेश सचिव व प्रभारी बशीर देशमुख तसेच लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, महानगरपालिकेचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अ‍ॅड. दीपक सूळ, अनुसूचित जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या जनजागरण अभियानाचा समारोप विक्रमनगरमधील पंचशील चौक येथे झाला. नानासाहेब डोंगरे यांनी सर्वांचे आभार मानले. या रॅलीत गोरोबा लोखंडे, सुभाष घोडके, आयुब मनियार, पप्पू देशमुख, महादेव बरुरे, विकास वाघमारे, बबन देशमुख, डॉ. बालाजी सोळुंके, धोंडीराम यादव, दत्ताभाऊ सोमवंशी, प्रवीण सूर्यवंशी, सुपर्ण जगताप व रमेश सूर्यवंशी, पवन सोलंकर व तसेच अ‍ॅड. बाबासाहेब गायकवाड राजासाहेब सवई, रत्नदीप आजनिकर, शामराव सूर्यवंशी, प्रा. एम. पी. देशमुख, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, रणधीर सुरवसे, आनंद चौधरी, आनंदभाई वैरागे, प्रा. एकनाथ पाटील, सुरेश चव्हाण, राहुल डुमणे, कुणाल संगारे, आकाश मगर, राजेश टाकेकर, राजेश शिरसागर, विकास कांबळे,राजू गवळी, कुणाल वागज, संजय ओवाळ, अकबर माडजे, सचिन पतंगे, कुणाल येडेकर, मनोज देशमुख, सुलेखा कारेपूरकर, मंदाकिनी शिखरे, तनुजा कांबळे, सुरेखा गायकवाड, यू. डी. गायकवाड, संदिपान सूर्यवंशी, बब्रुवान गायकवाड, यशवंत जोगदंड, संजय सुरवसे, किशोर शिरसाठ, अशितोष मुळे, गौतम मुळे, प्रबुद्ध कांबळे, हरीश वाघमारे, विनोद नवगिरे, बारीकराव गवळी, आयुष्यमान गणले, संगीता कांबळे, अलका कांबळे, संतोषी सोनवणे, रंजना पोटभरे, कपिल बनसोडे, महादेव लगडे, राजेश लामतुरे, करण दहीवडे, आतिश कांबळे, पंकज वहाळ, विनोद सातपुते, अभिषेक देवडे, प्रज्वल कांबळे, स्वप्निल कांबळे, सिद्धांत गायकवाड, प्रज्वल गायकवाड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या