20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeलातूरभाषा प्रभू न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचे कौतुक

भाषा प्रभू न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचे कौतुक

एकमत ऑनलाईन

लातूर : आयुष्याच्या साहित्य, संस्कृती, तत्वज्ञान, भाषा आणि शैली या पाच गुणांनी युक्त असे आयुष्यभर निष्ठात्म मराठी भाषा आणि साहित्याची सेवा करणारे कायद्याचे चिंतक, जेष्ठ विचारवंत आणि गंभीरवृत्तीचे सूजनशील वाडमय निर्माते न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बिनविरोध अध्यक्ष झाले आहेत, त्यामुळे त्यांचे त्रीवार कौतुक होत आहे.

न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे दयानंद कला महाविद्यालयाचे पहिले माजी मराठी विभाग प्रमुख होते. आरंभीच्या काळात महाविद्यालय आणि संस्थेची लोकप्रियता वाढविण्याचे ऐतिहासिक कार्य करणारे आपला विषय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नीटसा समजावून सांगणारे एक भूमिका संयमीपणे मांडण्यात माहीर असलेले इतिहासाचे अभ्यासक, वैचारिक पीळदारपणा आणि लालित्यपूर्णता ही त्रीसूत्रात्मक मांडणीतून एकूण सत्तावीस पुस्तकांचे मराठवाडी प्रकृती आणि प्रकृतीचे लेखक, विचारवंत लेखक अशी त्यांची ख्याती आहे. एकेकाळी लातूर च्या शैक्षणिक प्रक्रियेचे एक महत्त्वाचे साक्षीदार होते. दयानंद कला महाविद्यालयाचे माजी विभाग प्रमुख अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नाव जाहीर झाले याचा दयानंद परिवारास आनंद झाला आहे.

दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, लतिभाई शहा, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, सहसचिव सुरेश जैन, कोषाध्यक्ष संजय बोरा, प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, मराठी विभाग प्रमुख डॉ. शिवाजी जवळगेकर, डॉ. अंकुशकुमार चव्हाण, डॉ. सुनीता सांगोले, डॉ. सुभाष कदम, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, प्रा. राजकुमार मोरे, प्रा. अंगद भुरे, अधिक्षक रूपचंद कुरे यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या