27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरमनपाच्या भित्तीचित्र स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मनपाच्या भित्तीचित्र स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
स्वच्छसर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा आभियान अंतर्गत मनपाच्या वतीने घेण्यात आलेल्या भित्तीचित्र स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.४० स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला. स्पर्धेचा निकाल परीक्षकांनामार्फत लावण्यात येणार असून विजेत्यांना प्रजासत्ताक दिनी पारितोषिकांचे वितरण केले जाणार आहे.

आत्मनिर्भर भारत, आझादी का अमृत महोत्सव, एकता मे अनेकता -सर्व धर्म समभाव, स्वातंत्रवीरांच्या बलिदानाची माहिती, स्वच्छता विषयक संदेश, स्वातंत्र संग्रामातील शिलेदार, स्वातंत्र पूर्व काळातील प्रमुख घटना, पर्यावरण संदेश,आपले लातूर, माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मोहीम, लातूरमधील ऐतिहासिक वैभव या विषयावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी २५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक दिले जाणार आहे. त्याखालोखाल १५ हजाराचे द्वितीय, ११ हजार रुपयांचे तृतीय तर ५ हजार रुपयांची ३ उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत.

स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या स्पर्धकांना पालिकेच्या वतीने कोविड नियमांचे पालन करत जागा उपलब्ध करुन देण्यात आली होती. गुरुवारी स्पर्धा झाली. महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे, सर्व स्वच्छता निरीक्षक स्वच्छता विभाग लातूर यानीं स्पर्धेची पाहणी करुन सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले व सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. लातूर शहर महानगरपालिकेमार्फत प्रथमच आयोजीत या भित्तीचित्र स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या