निलंगा : मनरेगा ही योजना गेल्या अनेक वर्षांपासून धूळखात पडली होती. या योजनेला संजीवनी देत गतवर्षीपासून मतदारसंघाचे दौरे केले. शेतक-यांनी या योजनेचा पैसा वापरला पाहिजे केंद्र सरकारच्या या योजनेसाठी महाराष्ट्राला ऐंशी हजार कोटी मंजूर आहेत. याच योजनेचा लाभ शेतक-यांना मिळवून देत महाराष्ट्रात सर्वाधिक ३५ कोटींचा निधी औसा मतदारसंघात वापरला गेला असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
दि.१२ एप्रिल रोजी मनरेगातून ग्रामसमृद्धी या अभियानच्या दुस-या टप्प्याच्या अनुषंगाने ते निलंगा तालुक्यातील एकोजी मुदगड व नदी हत्तरगा येथे बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्रीनिवास काळे, लघु पाटबंधारे विभागाचे उप अभियंता काळे, भाजपचे कासारसिरसी मंडळाध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, बळवंत पाटील,पिराजी मंजुळे, लालासाहेब शेख,वसंत मंजुळे, सतीश मोहिते, प्रताप घोटाळे, काशीनाथ राजे, राजेंद्र घोडके, व्यंकट तोरंबे, मोहन इंगळे, प्रशांत येळनुरे, विलास पाटील, अरूण घोटाळे, महादेव खोबरे, मोहन कुनाळे, राजेंद्र घोटाळे, कमलाकर टेकाळे, अविनाश कुलकर्णी, तुकाराम व्हंताळे हे उपस्थित होते. यावेळी आमदार पवार म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकरी समृद्ध आहे. तिथे मराठवाड्यातील बहूभूधारक शेतक-याची आवस्था बिकट झाली आहे. हेच चित्र आपणास मनरेगाच्या माध्यमातून बदलायची आहे.
आमदार निधी देताना आपण मतदारसंघात पक्ष,जात, धर्म असा मतभेद केला नाही. मतदारसंघात असे एकही गाव नाही तिथे आमदार फंडातून काम सुरू नाही. आज मतदारसंघातील प्रत्येक गावात आमदार निधीतून कामे सुरू आहेत. मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने आपण काम करीत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.