22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरममतांच्या विरोधात निषेध आंदोलन

ममतांच्या विरोधात निषेध आंदोलन

एकमत ऑनलाईन

औसा : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पाठीराख्यावर सुरु असलेल्या टीएमसी पुरस्कृत अत्याचाराविरोधात आमदार अभिमन्यू पवार यांनी दि.५ मे रोजी औसा तहसीलसमोर निषेध व्यक्त केला. पश्चिम बंगालमध्ये अनेकांचे खून करण्यात आले आहेत, घरे जाळण्यात आली आहेत, घाबरून हजारो नागरिकांनी शेजारच्या राज्यात पळून जाऊन आश्रय घेतला आहे. या घटनेचा निषेध नोंदवत आमदार अभिमन्यू पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली तसेच ममता बॅनर्जी यांच्या बॅनरची होळी करीत निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा उपाध्यक्ष भीमाशंकर राचट्टे, संतोष मुक्ता, गटनेते सुनील उटगे, दीपक चाबूकस्वार, शंभू राजे भोसले, नगरसेवक समीर डेंग, संजय माळी,उमेश वागदरे, कल्पना डांंगे, भिमाशंकर मिटकरी, गोंिवद मुडबे, नवनाथ मुस्के,गंगाधर विसापूरे, विकास नरहरे, सागर अपुने, जगदीश चव्हाण, गजानन डोलारे, पप्पू शेख,सुनिता सूर्यवंशी, माधुरी पाटील, विनोद जाधव, प्रतीक पाटील, सचिन आंनसरवाडे, कुलदीप ठाकूर, ज्ञानेश्वर इंजे, सचिन कांबळे, महावीर चव्हाण, नितीन शिंदे, आकाश पाटील, गुणाजी पवार, शैलेश पाटील, समाधान झिरमिरे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते या निषेध आंदोलनासाठी उपस्थित होते.

बीपी,शुगर,दमा,हार्टचे गंभीर आजार असणा-या वयोवृद्धांच्या जीवाशी खेळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या