चाकूर : प्र्रतिनिधी
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसिल कार्यालय चाकूर येथे तहसीलदार रेणूकदास देवणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला. यात बळीराम सोनटक्के यांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच हयात नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचाही सत्कार करण्यात आला.
समारंभात प्रा. डॉ. राजेश तगडपल्लेवार यांचे मुक्तीसंग्रामाविषयी व्याख्यान झाले. तसेच इ.५ वी ची विद्यार्थिनी असलेल्या सिमरन पठाण हिने भाषण केले. विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख न्यायाधीश पी .पी .काळे ,सह न्यायाधीश एन .एस .लोनिया ,अधीक्षक धर्माधिकारी , डॉ. एल जी कोरे , डॉ. श्रीमती सुवर्णा कोरे हे उपस्थित होते. यावेळी तहसील कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन नायब तहसीलदार अक्षय म्हेत्रे यांनी केले. या प्रसंगी शासकीय अधिकारी,विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी,सामाजीक कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते.आभारप्रदर्शन तलाठी अविनाश पवार यांनी केले.
वैष्णवीचा पालकमंत्री यांच्या हास्ते सत्कार मराठवाडा मुक्तीसंग्रामादिना निमित आयोजित जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धात जानवळची कन्या वैष्णवी साखरप्पा वाघमारे हीचा द्वितीय क्रमांक आल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने मंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, मुख्यकार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलिस अधीक्षक सोमय्या मुंडे यांच्या हस्ते वैष्णवीचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपञ देऊन सन्मानपुर्वक गौरव करण्यात आला.