32 C
Latur
Monday, March 27, 2023
Homeलातूरमहागाईविरोधात महाविकास आघाडीचे धरणे

महागाईविरोधात महाविकास आघाडीचे धरणे

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल यांसह जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढीने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. सरकारचे यांकडे लक्ष नसून या सरकारने जनतेला वा-यावर सोडले असल्याचे मत महाविकास आघाडीच्या वतीने तहसील कार्यालसमोर महागाईच्या विरोधात आयोजित धरणे आंदोलनात आघाडीच्या नेत्यांनी बोलताना व्यक्त केले. यात केंद्र शासनाने केलेल्या गॅस दरवाढ, डिझेल, पेट्रोल दरवाढ, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याची दरवाढ, पिकविमा मध्ये शेतकरी बांधवांची झालेली फसवणूक व अनुदान वाटपातील दिरंगाई याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला व तसेच मनरेगाच्या जाचक अटी रद्द करुन रखडलेली कामे तात्काळ सुरू करणे, साकोळ येथील तालुकास्तरीय क्रीडा संकुलाचे रखडलेले काम तात्काळ सुरू करणे यांसह अन्य मागण्यांचे निवेदन तहसीलदार अतुल जटाळे यांना देण्यात आले. यावेळी केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत महाविकास आघाडीने बोंबा मारो आंदोलन केले, तर आंदोलनात चुल पेटवून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला.

या धरणे आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, उद्धव ठाकरे शिवसेना नेत्या डॉ.शोभाताई बेंजरगे, काँग्रेसचे नेते अभय साळुंके, राष्ट्रवादीचे नेते पंडीतराव धुमाळ, उध्दव ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, काँग्रेस नेते अजीतराव माने, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, उध्दव ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख भागवतराव वंगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पाटील, कार्याध्यक्ष अब्दुल अजीज मुल्ला, नगरसेवक सुधीर लखनगावे, नगरपंचायत गटनेते अनंत काळे, नगरसेवक संतोष शिवणे,काँग्रेस किसान सेल जिल्हाध्यक्ष संजय बिराजदार, माजी उपसभापती तानाजी निडवंचे, डॉ.अरंिवंद भातांब्रे, रामकिशन गड्डीमे, अनिल देवंगरे, अशोक कोरे, जब्बार पटेल, कृष्णा पवार, पंडीत लवटे, जर्नाधन पाटील, भरत शिंदे, रमेश सोनवणे, सतीश शिवणे, बाळासाहेब पाटील, ईस्माईल पठाण, संदीप धुमाळे, माधव खरटमोल,आदेश जरीपटके, मोहसिन सय्यद, ज्ञानेश्वर पाटील, महेश तिवारी, अभिनंदन दुरुगकर, सरोजा गायकवाड, गोंिवद श्रीमंगल, माधवराव रायवाडे, व्यंकट कल्ले, उस्मान मुल्ला, नवाज पठाण, गंगाधर शिंदे,सिध्दांत गायकवाड, ईरफान शेख, भास्कर जाधव, जगदिश सूर्यवंशी यांच्यासह महाविकास आघाडीतील काँंग्रेस, राष्ट्रवादी काँंग्रेस, उध्दव ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या