25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरमहामानवाला जिल्हाभरात अभिवादन

महामानवाला जिल्हाभरात अभिवादन

एकमत ऑनलाईन

जळकोट : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती जळकोट सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जळकोट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन केले. नालंदा बुद्ध विहार येथे ध्वजारोहण जळकोट उपनगराध्यक्ष मन्मथअप्पा किडे यांचा हस्ते झाले. मुख्य ध्वजारोहण नगराध्यक्ष प्रभावती कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच जळकोट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी अभिवादन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, माजी जि प सदस्य रामराव राठोड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, माजी जि प सदस्य चंदन पाटील, तहसीलदार सुरेखा स्वामी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, संग्राम हसुळे पाटील, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सत्यवान पाटील, माजी उपसभापती गोंिवदराव माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोकराव डांगे, बाजार समिती संचालक दिलीप कांबळे, गजानन दळवे, नगरसेविका सुरेखा गवळे, नगरसेवक नागनाथ धुळशेट्टे, नगरसेवक महेश धुळशेट्टे, विनायक डांगे, संग्राम नामवाड, गोविंद भ्रमन्ना, संदीप डांगे, शंकर धुळशेटे, अ‍ॅड. तात्या पाटील, खादर लाटवाले, माजी चेअरमन गणपत धुळशेट्टे, ओमकार धुळशेट्टे, डॉ. सचिन सिद्धेश्वरे, बाळू देवशेट्टे, विनायक जाधव, माजी प्राचार्य शिंगाडे, प्रा. चंद्रकांत कांबळे, अ‍ॅड. शामसुंदर गवळे, संग्राम कदम यांच्यासह अनेक नेते मंडळी तसेच जयंती उत्सव समितीच्या पदाधिका-यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकुर्ती पुतळयाला पुष्पहार घालून वंदन केले.

ग्रामपंचायत रावणकोळा
जळकोट तालुक्यातील रावणकोळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच सत्यवान दळवी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच राठोड, ग्रामसेवक शाम पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज दळवे, भाजपाचे सत्यवान पांडे, सिद्धार्थ सूर्यवंशी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

जळकोट तालुका काँग्रेस कार्यालय
जळकोट तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष मारुती पांडे यांच्या हस्ते आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपसभापती दत्ता पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, सरपंच मेहताब बेग, नगरसेवक संग्राम नाम वाड, मागासवर्गीय विभाग तालुका अध्यक्ष संग्राम कांबळे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज दळवे, रमेश धर्माधिकारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

जळकोट भाजपा कार्यालय
जळकोट येथील भाजप कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरविंद नागरगोजे, शहराध्यक्ष दत्ता वंजे, सोमेश्वर सोप्पा, किसन धुळशेट्टे, बालाजी मालुसरे, शंकर आण्णा धुळशेट्टे, दत्ता शेळके, पिटु नामवाड, बालाजी थोंन्टे, सागर कोटगीरे, राजेद्र गायकवाड, सय्यद मुस्सा, बाशा किल्ला, त्र्यंबक तोगरे, सरपंच बाबुराव गुट्टे आदि उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या