24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरमहामार्गालगत पर्यायी रस्ता देण्यात यावा

महामार्गालगत पर्यायी रस्ता देण्यात यावा

एकमत ऑनलाईन

चाकूर : तालुक्यातील सबंध मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर पुरस्कार प्राप्त आदर्श असलेल्या अलगरवाडीकरांना महामार्गाचा निष्काळजीपणा भोवला असल्यामुळे सबंध ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी अलगरवाडी येथून दररोज सकाळी ठरल्याप्रमाणे शाळेचे विद्यार्थी ऑटोमधून जात असताना महामार्गाचा रस्ता हा गावातून येणा-या रस्त्याच्यावर जवळपास चौदा फूट उंचीचा करून अलगरवाडीकरांना महामार्गावरून जाण्यासाठी व महामार्गावर येण्यासाठी अक्षरश: जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत असल्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेला आटो महामार्गावर चढत असताना अचानक समोरून वाहन आले आणि तो अ‍ॅटो मागे येत खड्ड्यात जाऊन पलटी झालाया लहान मुले पुरते घाबरुन जाऊन आरडाओरड केली. काही दिवसापूर्वीच या महामार्गाचे काम अलगरवाडी करांनी बंद पाडले होते याचे निवेदने नितीन गडकरी व महामार्गाच्या अभियंत्यांना सुपुर्द केली होती .

तब्बल १४ फूट उंचावर येण्यासाठी गावातील प्रत्येक वाहनांना कसरतच करावी लागत असल्यामुळे हा अनर्थ घडला असल्याचे सांगितले जाते. महामार्गाचे काम होण्याअगोदर अलगरवाडीकरांना दोन्ही बाजूंनी सर्विस रोडची अत्यंत गरज आसून तात्काळ रस्ता देण्यात यावा अन्यथा अलगरवाडीकरांनी केलेली बोगद्याची मागणी रास्त असून बोगद्याची निर्मिती करावी, या दोन्ही पर्यायांपैकी एखादे पर्याय येणा-या काही दिवसात केले नाही तर महामार्गाचे काम रोखून धरू असे अलगरवाडीकरांतून एक मुखी सांगण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या