29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरमहाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी विविध मागण्यासाठी २० डिसेंबरपासून बेमुदत संपावर

महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी विविध मागण्यासाठी २० डिसेंबरपासून बेमुदत संपावर

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस डॉ. आर. बी. सिंग व अध्यक्ष राजा बडे यास संलग्नित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाचे अध्यक्ष प्रताप नांगरे व सरचिटणीस गोविंद जोशी यांच्या आदेशानुसार राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी दि. २० डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार असून नांदेड विभागातील व लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त कर्मचा-यांनी संपात सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष धनराज जोशी यांनी केले आहे.

लातूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिका-यांची बैठक जिल्हा अध्यक्ष महेश सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्र) महाविद्यालयात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे संयुक्त सचिव अक्रम पठाण, सहसचिव सातलिंग गौड, विजय जागले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

महासंघाने अनेक निवेदन, बैठका होऊन सुद्धा खालील प्रमुख मागण्या सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करणे व अन्यायकारक ७ डिसेंबर २०१८ व १६ फेब्रुवारी २०१९ शासन निर्णय रद्द करणे, सातवा वेतन आयोगाची तीन लाभाची प्रगती योजना लागू करणे, पाच दिवसाचा आठवडा लागू करणे, रिक्त पदे तात्काळ भरण्यात मंजुरी देणे, १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, या मागणीचे शासनास निवेदने देण्यात आली. शासनाच्या या चुकीच्या निर्णयामुळे ८५ टक्के कर्मचारी व २०१८ नंतर निवृत्त झालेले कर्मचारी सातवा वेतन आयोगाच्या लाभापासून वंचित आहेत. शासनाच्या या वेळकाढू पणाच्या विरोधात महासंघाने दि. १४ ते १९ डिसेंबर या कालावधीत काळ्या फिती लावून आंदोलन करणे व दि. २० डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या