18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeलातूर'मांजरा'परिवारामुळे ‘अच्छे दिन’

‘मांजरा’परिवारामुळे ‘अच्छे दिन’

एकमत ऑनलाईन

रेणापूर : गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये रेणा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे वेळेवर गाळप करील व त्या माध्यमातून शेतक-यांना अर्थिक आधार देण्याची यशस्वी परंपरा कायम ठेवील, मांजरा परिवाच्या माध्यमातून ऊस उत्पादकांच्या जीवनात ‘अच्छे दिन’ आले आहेत, असे प्रतिपादन रेणा कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांनी केली. रेणा कारखान्याच्या २०२२-२३ च्या १७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख हे होते. जिल्हा मध्य.सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास माजी आमदार त्र्यंबक भिसे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, रेणा कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, श्री संत मारोती महाराज कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, मांजरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल्य उटगे, ट्वेन्टी वन कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास कारखान्याचे व्हाईस चेअरमन काळे, श्री संत मारोती महाराज कारखान्याचे व्हाईस चेअरमन शाम भोसले, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, संचालक धनराज देशमुख, संजय हरिदास, प्रेमनाथ आकणगिरे, संग्राम माटेकर, प्रविण पाटील, संभाजी रेड्डी, शहाजीराव हाके, तानाजी कांबळे लालासाहेब चव्हाण, अनिल कुटवाड, संचालीका सौ.वौशालीताई माने, सौ.अमृताताई स्रेहलराव देशमुख, मांजरा कारखान्याचे कार्यकारी संचालक रनवरे, विलास युनीट १ चे कार्यकारी संचालक देसाई, श्री संत मारोती महाराज कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.बी.बरमदे रेणाचे कार्यकारी संचालक बी.व्ही.मोरे यांच्या उपस्थितीत सोमवारी दि.७ नोव्हेंबर २०२२ रोजी गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगाम शुभारंभ करण्यात आला.

माजी मंत्री तथा संस्थापक दिलीपराव देशमुख म्हणाले की, आता आपल्या कारखान्यांची स्पर्धा राज्यामध्ये नसून बाहेरील राज्याशी राहणार आहे. आणि यामध्ये यश मिळवणे आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून शक्य होईल. आपण सर्व मांजरा परीवाराचे सदस्य आहात आणि परीवाराच्या प्रमुखावर आणि आपल्या संस्थारूपी मंदीरावर जर कोणी खोटे आरोप करीत असतील तर त्यांना जागेवरवरच योग्य ते उत्तर देण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी प्रत्येक जण पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करून रेणा कारखान्यास गळीत हंगामासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रारंभी कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.व्ही.मोरे यांनी प्रास्तावीकपर भाषणात कारखान्याने हंगामासाठी केलेल्या तयारीचे विवेचन केले व कारखान्याचें चेअरमन सर्जेराव मोरे यांनी कारखान्याच्या उभारणीपासून केलेल्या प्रगतीचा आढावा उपस्थितासमोर मांडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सचीन सुर्यवंशी यांनी केले तर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. ऊस उत्पादकांची अर्थव्यवस्था सुधारली! माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे मनोगत मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख म्हणाले की, सद्या देशाची आर्थिक व्यवस्था खालावली आहे परंतू मांजरा परीवाराने मागील हंगामात कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करून प्रती टन २७०० रुपयांपर्यंत भाव देऊन ऊस उत्पादकांची आर्थिक घडी सुधारण्यास हातभार लावला यांचे मांजरा परीवाराचा एक सदस्य म्हणून मला अभिमान वाटतो असे मत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले

रेणा कारखान्याचे आर्थिक नियोजन कौतुकास्पद: आमदार धीरज देशमुख
रेणा कारखान्याचे आर्थिक नियोजन खरोखर कौतुकास्पद असल्याचा प्रत्यय लातूर जिल्हा मध्य.बँकेचा चेअरमन असल्यामुळे आला. कारखान्याने बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता भरण्याची मुदत पुढे असतानाही कारखान्याने मुदतपुर्वी हप्ता भरणा केला असून सहकार क्षेत्रास आदर्श घ्यावा असा रेणा कारखान्याचा कारभार असल्याचे सुचीत करून त्यामुळे आमची बँक कारखान्यास गरज पडेल तेव्हा अर्थ सहाय्य करण्यास तयार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या