28.3 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeलातूरमांजरा पट्ट्याप्रमाणेच तेरणा पट्ट्याचाही विकास साधणार

मांजरा पट्ट्याप्रमाणेच तेरणा पट्ट्याचाही विकास साधणार

एकमत ऑनलाईन

निलंगा : प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथे सध्या बंद असलेला डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना आता ट्वेन्टीवन शुगर लि. चालवणार असून गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर कारखाना मेन्टेनन्सचा कामाचा शुभारंभ करुन निलंगा तालुक्यात विकासाची गुढी उभारली आहे, असे नमुद करुन यापुढे मांजरा पट्ट्याप्रमाणेच तेरणा पट्ट्याचाही विकास साधला जाईल, अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य शिखर बँकेने अंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना ट्वेन्टीवन शुगरला दिर्घ मुदतीने भाडेतत्वावर दिला असून शनिवार दि. २ एप्रिल रोजी पालकमंत्री
अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते याठिकाणी मशिनरीचे पुजन करुन मेन्टेनन्सच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात केली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख म्हणाले की, बंद कारखाना चालू करण्याचा संकल्प करुन आज निलंगा तालुक्यात विकासाची गुढी उभारली आहे. या माध्यमातून मांजरा पट्ट्याप्रमाणेच तेरणा पट्ट्याचाही सर्वांगीण विकास साधला जाईल. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दूरदृष्टी ठेवून उभारलेली साखर कारखानदारी सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळातही अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवून त्यांचे स्वप्न साकार केले जाईल.

प्रारंभीच्या वक्त्यांनी बोलताना, मागच्या सरकारच्या काळात हा कारखाना सुरु होऊ शकला नाही त्याबद्दल खंत व्यक्त केली होती. तो संदर्भ घेऊन बोलताना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, शेतक-यांना फायदेशीर ठरणारा ऊसच लाऊ नये असे ज्यांचे मत आहे त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करणेच चुकीचे आहे. महाविकास आघाडीचे सरकार शेतक-याच्या पाठीशी आहे. त्यामुळे शेतक-यांना फायदेशीर ठरणारे निर्णय हे सरकार घेत आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात वाढलेल्या मांजरा परिवाराकडे अंबुलगा येथील हा साखर कारखाना आल्याचा शेतक-यांना आनंद आहे. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगीतले.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंके यांचेही उत्स्फुर्त भाष्ण झाले. त्यांनी शेतक-यांच्या भावना बोलुन दाखवल्या. मांजरा परिवाराने शेतक-यांची अडचण लक्षात घेऊन अंबुलगा कारखाना चालवण्यास पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी निलंगा तालुक्यातील जनतेच्या वतीने पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी माजी सभापती अजित माने यांनी आभार मानले. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, सचिव अभय साळुंखे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, उमेश जोशी, रेणा साखचे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र काळे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, लातूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा सूर्यशिला मोरे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, माजी सभापती अजित माने, लक्ष्मणराव मोरे, दिलीप माने, विजयकुमार पाटील, राजकुमार जाधव, अ‍ॅड. नारायण सोमवंशी, हमीद शेख, सुधाकर पाटील, दत्तात्रय देशमुख, अजय देशमुख, सुरेंद्र धूमाळ, महेश देशमुख, दयानंद चोपणे, विलास लोभे, बालाजी वळसांगवीकर, मालबा घोणसे, गजानन भोपणीकर, माधवराव पाटील, लाला पटेल, अ‍ॅड. तिरुपती शिंदे, अ‍ॅड. संदीप मोरे, कार्यकारी संचालक समीर सलगर आदींसह काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या