24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeलातूरमाजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा औसा तालुक्यातील मतदारांच्या वतीने सत्कार

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा औसा तालुक्यातील मतदारांच्या वतीने सत्कार

एकमत ऑनलाईन

औसा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीत सहकार पॅनलचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे संचालक मंडळ मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. त्याबद्दल त्यांचा औसा तालुक्यातील चेअरमन व मतदाराच्या वतीने हिप्परसोगा सोसायटीच्या चेअरमन तथा जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालक सौ. स्वयंप्रभा पाटील यांच्या हस्ते बुधवारी आशियाना निवासस्थानी सत्कार करण्यात आला.

यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, जिल्हा काँग्रेस कमीटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, मारुती महाराज कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, व्हा. चेअरमन शाम भोसले, ऊदयंिसह देशमुख, राष्ट्रवादीचे दत्तू कोळपे, मजूर फेडरेशनचे संचालक बाबासाहेब पाटील, अनुसुचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड बाबासाहेब गायकवाड, मारुती महाराजचे संचालक सचिन पाटील युवा नेते वेताळेश्वर बावगे जि. प. सदस्य पांडुरंग चेवले; चेअरमन शिवाजी हांडे. चेअरमन किरण बाभळसूरे,चेअरमन गोरख सावंत चेअरमन दिलीप कोल्हे चेअरमन मोरे, चेअरमन गुणवंत पाटील कृष्णा बालाजी पाटील सुखदेव यादव पाटील ,आजमखान पठाण वाघंबर कांबळे, जे. पी. कांबळे सुनिल पवार, आदी चेअरमन मतदार उपस्थित होते. याप्रसंगी पॅनल प्रमुख श्रीपतराव काकडे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांचाही सत्कार करण्यात आला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या