26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूरमाजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्यात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर माजी मंत्री सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत
सहकार पॅनलचे १९ पैकी १८ उमेदवार बहुमतांनी विजयी करुन पुन्हा जिल्हा बँकेवर सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. त्याबद्दल जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने मंगळवारी आशियाना निवासस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आशियाना निवासस्थानी लोकांनी गर्दी केली होती. दरम्यान दिलीपराव देशमुख यांनी सर्व लातूरकरांचे मनापासून शुभेच्छा स्वीकारत आभार व्यक्त केले.

सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत औसा, रेणापूर, निलंगा, उदगीर, चाकूर, अहमदपूर, लातूर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी मतदार चेअरमन सरपंच, मांजरा परिवारातील साखर कारखाण्याचे विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी मंगळवारी आशियाना निवासस्थानी येवून दिलीपराव देशमुख यांचा सत्कार केला. याप्रसंगी माजी आमदार अ‍ॅड. त्रिबक भिसे, जागृती शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, लातूर जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक अ‍ॅड. श्रीपतराव काकडे, अ‍ॅड. प्रमोद जाधव, संचालक एन. आर. पाटील, व्यंकटराव बिरादार, अनूप शेळके, सौ. स्वयंप्रभाताई पाटील, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य नारायण लोखंडे, जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, उदगीर तालुका काँग्रेस अध्यक्ष कल्याण पाटील, शिरुर अनंतपाळ तालुका काँग्रेस अध्यक्ष आबासाहेब पाटील, लातूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके, प्रभाकर केंद्रे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते सत्तार पटेल, जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी, राजेंद्र मोरे, नवनाथ श्ािंदे, राजीव कसबे, विविध संस्थांचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या