29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरमातीकाम झालेल्या शेतरस्त्यांचे आराखडे सादर करावेत

मातीकाम झालेल्या शेतरस्त्यांचे आराखडे सादर करावेत

एकमत ऑनलाईन

औसा : मातोश्री ग्रामसमृध्दी योजना राज्यात पुढच्या वर्षी कार्यान्वित होणार असून सध्या औसा विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री पाणंद रस्ते कामासाठी आराखडे तयार असून सदरील कामांची मातोश्री ग्रामसमृध्दी योजनेतून मंजुरीसाठी प्रशासनाने तातडीने आराखडे सादर करावेत अशा सूचना आमदार अभिमन्यू पवार यांनी दिल्या आहेत.

दि. ८ डिसेंबर रोजी औसा तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, औसा- निलंगा उपविभागीय अधिकारी गायकवाड, औशाचे तहसीलदार भरत सूर्यवंशी, निलंगा तहसीलदार गणेश जाधव, औशाचे गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, निलंगा गटविकास अधिकारी अमोल ताकभाते हे उपस्थित होते.

आमदार पवार यांनी या बैठकीतून रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता याबाबत सदरील कामाचे प्रस्ताव विशेष बाब म्हणून पाठविण्यात यावेत त्यास मंजुरी देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेत ज्याप्रमाणे या कामांना यंत्रचा आधार देण्यात आला आहे. त्याप्रमाणे मातोश्री ग्रामसमुध्दी योजनेत काही बाबीचा समावेश झाला तरी या योजनेला अधिक गती येईल अशी विनंतीही आमदार पवार यांनी यावेळी बोलताना रोहयोमंत्री भुमरे यांना केली.

या आढावा बैठकीत आमदार पवार म्हणाले की महाराष्ट्राला दिशा देणारा औसा पॅटर्न झाला असून यामधूनच राज्य मंत्रिमंडळाने मातोश्री पाणंद रस्ते व शरद पवार ग्रामसमुध्दी योजना समोर आणली आहे. औशाच्या दोन दिशादर्शक योजना महाराष्ट्रात राबविल्या जात आहेत गतवर्षी शेतरस्ते अभियानातून ६४० किलोमीटर लांबीचे शेतरस्ते कामे यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत.या पुढील कामासाठी प्रशासनाने तातडीने प्रस्ताव द्यावेत असे सांगून ज्याप्रमाणे जनसुविधा योजना ग्रामपंचायत स्तरावरवर राबविली जाते तसेच शेतरस्ते ही योजना ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात यावी अशीही आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या