25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरमातृभूमीने दिले विद्यार्थ्यांना वृक्ष दान-दत्तक

मातृभूमीने दिले विद्यार्थ्यांना वृक्ष दान-दत्तक

एकमत ऑनलाईन

उदगीर : प्रतिनिधी
मातृभूमी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने विद्यार्थ्यांना वृक्ष दान-दत्तक देत वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे कार्य सुरु आहे. मातृभूमी महाविद्यालय मागील आनेक वर्षापासुन पर्यावरणाचे संवर्धन व श्रमदानाचे तसेच पर्यावरण विषयक जाणीव-जागृतीचे काम करते. विद्यार्थ्यामध्ये पर्यावरण संवर्धना बरोबरच जानिव जागृतीसाठी अशा विविध उपक्रमाचे आयोजन करत असते. यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिश उस्तुरे, प्राचार्या उषा कुलकर्णी, कांर्यक्रमाधिकारी प्रा. बिभीषण मद्देवाड यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ७५ वृक्ष विद्यार्थ्यांना दत्तक देत वृक्ष वृक्षसंवर्धनाची शपथ दिली. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना दत्तक दिलेल्या वृक्षाचे आपल्या शेतात व घरी उपलब्ध असलेल्या जागेत वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धन करणार आहेत. महाविद्यालयात शिक्षण चालू असे पर्यंत वृक्षा विषयीची महिती विद्यार्थी महाविद्यालस देणार आहेत. यावेळी मातृभूमी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वंयसेवक, विद्यार्थी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या