किनगाव : प्रतिनिधी
श्री अग्निसंत माधवबाबांच्या पायी दिंडी पालखी सोहळा मार्गावर मोळवण ते किनगाव दरम्यान वृक्षारोपण केलेल्या झाडाचे संगोपन करण्याचा संकल्प कोळवाडीकरांनी केला आहे.
पायी दिंडी पालखी सोहळा मार्गावर मोळवण ते किनगाव ६ कि मी रोडच्या दोन्ही बाजूनी वृक्षारोपन करण्यात आले आहे. या सर्व वृक्षाचे संगोपण करण्याचा संकल्प कोळवाडीकरांनी केला आहे. कोळवाडीचे मुक्तीराम दहिफळे, लक्ष्मन दहिफळे, विट्टल दहिफळे, भिमराव दहिफळे, गोविंद दहिफळे, वैजनाथ दहिफळे, राम दहिफळे आदीजण प्रत्येक झाडास संरक्षण जाळीदार कुंपन तयार करत आहेत.
या मार्गावरून जाणारे दुधवाले रिकाम्या कॅनमध्ये पाणी भरून झाडांना पाणी घालत आहेत. तसेच महाविद्यालय व शाळचे विद्यार्थी घरी परत जाताना पाणी बॉटल मधील शिल्लक पाणी झाडांना घालत आहेत. पाणीै टँकरवाले सुद्धा शिल्लक पाणी झाडाला घालून वृक्षसंगोपन करत आहेत.