26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूर‘मारुती महाराज’चा गळीत हंगाम शुभारंभ शनिवारी

‘मारुती महाराज’चा गळीत हंगाम शुभारंभ शनिवारी

एकमत ऑनलाईन

औसा : औसा तालुक्यांतील श्री संत मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचा २०२१-२२ चा गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली २७ नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी १२.५ मिनिटांनी होणार असून प्रमुख पाहूणे म्हणून राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार ओमराजे ंिनंबाळकर, आमदार धीरज विलासराव देशमुख, माजी आमदार दिनकर माने हभप महेश महाराज कानेगावकर यांची उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमास राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जागृती शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, रेणा चे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, ट्वेण्टी १ शुगर चे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास शेतकरी सभासद ऊस उत्पादक, हितंिचतक यांनी उपस्तित राहावे, असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या