19.6 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeलातूरमूलभूत सुविधांसाठी पाच कोटींचा निधी

मूलभूत सुविधांसाठी पाच कोटींचा निधी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या कामांसाठी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी पाठवलेला प्रस्ताव मान्य करीत राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून लातूर ग्रामीण मतदारसंघातील ७१ गावांत सभागृह, सिमेंट काँक्रीट रस्ता, नाली बांधकाम अशी विविध विकासकामे होणार आहेत.

सरकारकडून विविध विकासकामे मंजूर करुन आणण्यासाठी आमदार धिरज देशमुख हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच लातूर ग्रामीण मतदारसंघात सध्या अनेक विकासकामे सुरू आहेत. त्यातच आता आणखी ५ कोटींच्या विकासकामांची भर पडली आहे. याबाबत आमदार धिरज देशमुख यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला होता. त्यांनी दिलेल्या मंजुरीमुळे लातूर ग्रामीण मतदारसंघात येणा-या लातूर तालुक्यातील ३२ गावात २ कोटी ५४ लाख रुपयांची, रेणापूर तालुक्यातील ३१ गावात १ कोटी ८५ लाख रुपयांची तर औसा तालुक्यातील ८ गावात ६१ लाख रुपयांची कामे होणार आहेत.

रेणापूर तालुक्यातील जवळगा ७ लाख), कारेपुर (८ लाख), घनसरगांव (७), डिगोळ देशमुख (९), खरोळा (१०), फरदपुर (५), माकेगांव (९), खानापुर (८), भोकरंबा (८), गोढाळा (३), डिघोळ देशपांडे (५), रामवाडी को (३), सुकणी (७), शेरा (५), आरजखेडा(७), वांजरखेडा (१०), आंदलगाव (७), सिंधगाव (७), गव्­हाण (५), दर्जीबोरगाव (७), पानगाव (१०), रामवाडी पा. (३), नरवटवाडी (३), व्­हटी नं.1 (५), कोष्­टगाव (५), तत्­तापुर (५), चाडगाव (३), पाथरवाडी (३), रामवाडी ख. (५), सय्यदपुर बु. (३), दिवेगांव (३) या गावातील विकासकामे मंजूर झाली आहेत.

औसा तालुक्यातील सिंदाळा लो. (१० लाख), टेंबी (८ लाख), ब-हाणपुर (८), येल्­लोरीवाडी (३), काळमाथा (७), कोरंगळा (५), लखनगांव (१०), उटी बु. (१०) या गावांमधील तर लातूर तालुक्यातील चिखुर्डा (१० लाख), मुशिराबाद (७), बामणी (५), रमजानपुर (५), ममदापूर (७), एकुर्गा (१०), ंिबदगीहाळ (५), सलगरा खु (१०), गुंफावाडी (५), शिवूर (५), साखरा (१०), बोरगाव बु. (१०), मसला (१०), तांदुळवाडी (८), सामनगाव (१०), कासारखेडा (१०), शिवणी खू (१०), माटेफळ (८), नागझरी (१०), बोकनगाव (१०), भाडगाव (५), गाधवड (७), सावरगाव (५), ढोकी (७), शिराळा (१०), निवळी (७), वाडी वाघोली (७), ंिपपळगाव अंबा (५), मळवटी (३०), गोंदेगाव (६.२५ लाख) या गावातील कामांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख यांचे आभार मानले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या