लातूर : प्रतिनिधी
इस्कॉन लातूर सेंट्रल शाखेकडून जिल्हास्तरीय मूल्य शिक्षण संवर्धन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण दि. २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. कल्याण बरमद व माजी नगरसेवक डॉ. बालाजी सोळुंके उपस्थित होते. इस्कॉनतर्फे मालिनीदेवी दासी, साधना आनंद दास व श्रीनिवास प्रिय दास इत्यादी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील ७२ शाळातून आठ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आली होती; पहिल्या गटात इयत्ता पाचवी ते सातवी व दुस-या गटात इयत्ता आठवी ते दहावी.
यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी सायकलीचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेमध्ये लहान गटातून जवाहरलाल नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी श्रीवर्धन घवले व श्री अनंतपाळ नूतन विद्यालय शिरुर अनंतपाळ या शाळेतून वेदांत वीरभद्र बेंबलगे यांनी प्रथम क्रमांक पारितोषिक मिळविले तसेच मोठ्या गटातून जनता विद्यालय मुरुड या शाळेतून अमित लोंढे व पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थिनी कल्याणी महेश गटाटे यांनी प्रथम पारितोषिक मिळविले. सर्व शाळांमधून ४२० विद्यार्थ्यांना विविध स्वरुपाचे बक्षीस देण्यात आले. मूल्य शिक्षण वर्ग इस्कॉनद्वारे चालवल्या जाणा-या योग व ध्यान धारणा केंद्र, गरड गार्डनच्या पाठीमागे, विशालनगर येथे घेण्यात येतील.