27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeलातूरमेंढपाळांच्या हक्क, संरक्षणाचा ठराव मांडणार : डॉ. टकले

मेंढपाळांच्या हक्क, संरक्षणाचा ठराव मांडणार : डॉ. टकले

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे दि. २३ व २४ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या ४ थ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. या संमेलनात विविध विषयांवर परिसंवादांसह अभ्यासक, लेखकांची चर्चासत्रे होणार आहेत. राज्यभर मेंढपाळांवर हल्ले होत आहत्ो. हे हल्ले रोखण्यासाठी सरकारने मेंढपाळांच्या हक्क संरक्षणाचा कायदा करावा, असा ठराव संमेलनात केला जाणार असल्याची माहिती संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी लातुरात पत्रकारांशी बोलताना दिली.

सांगोला हे दिवंगत लोकनेते स्व. आमदार भाई गणपतराव देशमुख यांची कर्मभूमी असल्याने यावर्षीचे हे साहित्य संमेलन त्यांच्या नावाने होत असल्याचे सांगून डॉ. टकले पुढे म्हणाले की, या साहित्य संमेलनाचे उद्घाटन दि. २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष प्राचार्य आर. एस. चोपडे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार राम शिंदे, पद्मश्री खासदार डॉ. विकास महात्मे, श्रीमती रतन गणपतराव देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर,आमदार रामराव वडकुते, आमदार प्रशांत परिचारक, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

साहित्य संमेलनाच्या समारोपासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्ली विधानसभेचे आमदार दिनेश मोहनिया, आमदार दत्ता भरणे, अण्णासाहेब डांगे, आमदार शहाजीबापू पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या साहित्य संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सांगोल्याच्या नगराध्यक्षा राणीताई माने यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रा. पी. सी. झपके, छायाताई मेटकरी, स्वातीताई मास्के यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. धनगर सारा एक या विषयावरील परिसंवादात ख्यातनाम साहित्यिक संजय सोनवणी हे मार्गदर्शन करणार आहेत. तर धनगरांचा गौरवशाली इतिहास या विषयांवर प्रा. राम लाड,
अविनाश धायगुडे आपले विचार मांडणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चंद्रकांत हजारे हे भूषविणार आहेत. या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचेही डॉ. टकले यांनी सांगितले.

संमेलनाचे उपाध्यक्ष संभाजीराव सूळ यांनी यावेळी बोलताना दोन दिवस चालणा-या या साहित्य संमेलनात विविध विषयावरील परिसंवाद, चर्चासत्र, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले. कोणतीही शासकीय मदत न घेता समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहकार्याने हे संमेलन पार पडणार आहे. हे साहित्य संमेलन सांगोला येथे घ्यावे अशी दिवंगत आ. गणपतराव देशमुख यांची इच्छा होती. म्हणून यावर्षीचे हे संमेलन त्यांच्या नावे होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी प्राचार्य मधुकर सलगरे, सांगोल्याचे विस्तार अधिकारी टकले, केसाळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. चंद्रकांत हजारे यांनी या साहित्य संमेलनाच्या आयोजना मागची पार्श्वभूमी विषद केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या