लातूर : प्रतिनिधी
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त रविवारी मनपा व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त्त विद्यमाने मिरागी नेत्रालयात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झाले. मनपा आयुक्त्त बाबासाहेब मनोहरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या शिबिरात ८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. रुग्णांना चष्मा व फळे वाटप करण्यात आले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. यानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाअंतर्गत सर्व प्रभागात कलश पूजन करण्यात येत आहे. मुक्तिसंग्रामदिनी शहरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरही घेण्यात आले. देशासाठी बलिदान दिलेल्या शुरांचे व स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना आगामी काळात देशाची वाटचाल कशी असावी? यावर मंथन व्हावे तसेच २०४७ पर्यंत आपला देश देश विकसित देश म्हणून नावारुपाला यावा यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे.
यासाठीच ‘माझी माती माझा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहरातील नागरिकांना माहिती होण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या बचत गटाच्या महिला शहरात घरोघर जाऊन महत्त्व पटवून देत आहेत. प्रत्येक घरातून दोन वेगवेगळ्या कलशांमध्ये तांदूळ व माती संकलित केली जात आहे. झोन डी अंतर्गत प्रभाग क्रमांक ८ मध्ये हा उपक्रम झाला. झोनमधील मनपाचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त रविवारी मनपा व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त्त विद्यमाने मिरागी नेत्रालयात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झाले. त्यात ८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, मनपा उपायुक्त्त वीणा पवार, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. श्रीधर पाठक, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील, मिरागी नेत्रालयाचे अध्यक्ष विजयकुमार राठी, आशिष बाहेती, गिरवलकर, डॉ. स्वामी, डॉ. सावंत, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता कदम, डॉ. स्वाती मजगे, डॉ. बगडे, सारगे आदींची उपस्थिती
होती.