23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरमोबाईलच्या प्रभावामुळे जुन्या खेळाकडे मुलांचे दुर्लक्ष

मोबाईलच्या प्रभावामुळे जुन्या खेळाकडे मुलांचे दुर्लक्ष

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख -टी व्ही व मोबाईलने आबालवृद्धावर गारूड घाटले आले. अ‍ॅन्ड्राईड मोबाईलचा अति वापर बालमनावर प्रभावकारी ठरला असून दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाण्यासाठी हट्ट धरणारी मुले मोबाईलची मागणी करू लागले आहेत. त्यात धावपळीच्या जीवनात पालकांना वेळ नसल्याने या तंत्रयुगात अक्षरश: मामाचे गाव हरवले आहे.सध्या पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब व सोशल मिडियामुळे माणसांमाणसांतील संवाद हरवत चालला असून यामुळे नात्यामध्ये नकळत दुरावा निर्माण झाला आहे.

कामात व्यस्त असणारे पालक पैसे कमावण्याची धावपळ त्यात मुलांचे सुट्टीतील शिक्षण या गोष्टी ही याला कारणीभूत असल्या तरी या तंत्रयुगात मुलांना मामाच्या गावाचा पडलेला विसर नात्यात दरी निर्मिण करण्याची करणारी ठरली आहे. दरम्यान मानवी
जीवनात नाती संबंधाना खुप मोठे महत्व आहे. सण वार असो की दिवाळी व उन्हाळ्याची सुट्टी असो मामाच्या गावचा प्रवास हमखास व्हायचा. मुलांना सुट्या लागल्या, की पहिली आठवण मामाच्या गावाची व्हायची दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत जाण्यासाठी मामाचे गाव म्हणजे हक्काची जागा असायची पण आजच्या तंत्रयुगात टीव्ही, मोबाईलमध्ये रमलेली मुले मामाचा गाव विसरली असून ग्रामीण भागातल्या मुलांनाही सुट्यांमध्ये मामाच्या गावाला जायची पूर्वीची गंमत आता राहिलेली नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या