23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरयेरोळ मोड येथे शेतक-यांचे रस्ता रोको आंदोलन

येरोळ मोड येथे शेतक-यांचे रस्ता रोको आंदोलन

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : सततचा पाऊस व गोगलगायींमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून खरीप हंगाम हातचे गेले आहे. खरीप पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतक-यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये तातडीने अनुदान द्यावे, या मागणीसाठी सतीश सिंंदाळकर यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, माजी कृषी सभापती गोंिवंदराव चिलकुरे यांच्या उपस्थितीत सोमवारी येरोळ मोड येथे शेतक-यांनी रस्ता रोको आंदोलन केले.

जिल्ह्यासह तालुक्यात सततचा पाऊस व गोगलगायीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी,अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतक-यांंनी दिला होता मात्र शासनाने यांकडे लक्ष दिले नसल्याने शेतक-यांच्या वतीने लातूर ते उदगीर मुख्य रस्त्यावर येरोळ मोड येथे आंदोलन करण्यात आले. दरम्यान निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात मदत करण्याऐवजी मदतीतून शासनाने लातूर जिल्ह्याला वगळून शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याने संतप्त शेतक-यांंनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. या आंदोलनात शेतक-यांंनी डोक्यावर मी शेतकरी लिहलेली टोपी व हातात हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या, अशा मागणीचे फलक धरले होते.

मुख्य रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. अखेर माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील यांनी दुरध्वनीवरून शेतक-यांशी संवाद साधत शासन दरबारी मदतीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासित केल्यानंतर नायब तहसीलदार राहूल पत्रिके यांना मागणीचे निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या