लातूर : प्रतिनिधी
राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे लातूर दौ-यावर आले होते.
यावेळी मराठवाडा व्यापारी संघाचे अध्यक्ष दिनेश गिल्डा यांनी लातूर येथील रजिस्टरी कार्यालयात अडचणी बाबत निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच मोजणी बाबत दिरंगाई होत असल्याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी मंत्री विखे-पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी भाजपा प्रदेश प्रवकत्या प्रा. प्रेरणा होनराव आदींची उपस्थिती होती.
रजिस्ट्री कार्यालयातील अडचणी मांडल्या
एकमत ऑनलाईन