26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूरराज्यमार्गात रूतली ट्रक्टरची चाके

राज्यमार्गात रूतली ट्रक्टरची चाके

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर-कळंब या दुपदरी २३६ नंबरच्या राज्यमार्गाचे काम गेल्या गेल्या दोन वर्षापासून मंद गतीने सुरू
होते. मात्र या राज्यमार्गाचे काम गेल्या दहा महिण्यापासून ठप्प झाले आहे. तसेच गेल्या आठवडयात झालेल्या पावसामुळे लातूर-कळंब या राज्यमार्ग खचल्याने वाहणांची चाके रत्यात रूतून बसत असल्याने या राज्यमार्गावरून ये-जा करणा-या प्रवाशांना, वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मांजरा पट्टयातील गावांना जोडणारा लातूर-कळंब हा ६०.४८५ कि.मी. चा २३६ नंबरचा राज्यमार्ग अत्यंत महत्वाचा आहे. अनलॉक नंतर या रस्त्यावरून दिवसाला हजारो वाहनांची ये-जा असते. या राज्यमार्गाचे रूंदीकरण व नुतनीकरण करण्याचे काम १८ नोव्हेंबर २०१९ पासून सुरू आहे. गेल्या तीन वर्षापासून या राज्यमार्गावरील लातूर तातुक्यातील लातूर ते कानडी बोरगाव या ३१ कि.मी. च्या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी व रूंदीकरणासाठी रस्ता दुतर्फा खोदला. कानडी बोरगाव ते जवळा, काटगाव पर्यंत या रस्त्याचे ब-यापैकी एकतर्फी व दुतर्फा डांबरीकरणाचे काम झाले आहे. तर त्यापुढे राज्यमार्ग लातूर पर्यंत पूर्णत: खोदून ठेवला आहे. त्यामुळे हा राज्यमार्ग आसून आडचण नसून खोळंबा ठरत आहे.

लातूर तालुक्यात गेल्या आठवडयात झालेल्या जोरदार पाऊसामुळे लातूर-कळंब राज्यमार्गावर जागोजागी पाणी साचले होते. सध्या शेतक-यांच्या ऊसाच्या तोडी सुरू आहेत. साखर कारखान्यांच्या पर्यंत ऊस घेवून जाण्यासाठीही या मार्गाचा मोठया प्रमाणात वापर होतो. गेल्या आठवडयात झालेल्या पावसामुळे खोदलेल्या राज्यमार्गात ऊस भरलेल्या वाहनांची चाके रूतून बसत असल्याने वाहन चालकांचे नुकसान होत आहे. तसेच ज्या शेतक-यांचा ऊस तोडून नेला जात आहे. अशा शेतक-यांचा ऊसही वाळत आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठीही हा रस्ता धोकादायक ठरत आहे. त्यामुळे या रस्त्याचा विषय केंव्हा मार्गी लागणार असा प्रश्न शेतक-यांच्या मधून उपस्थित होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या