26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरराज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२२ लातूर जिल्ह्यात ५६४० विद्यार्थी परीक्षा देणार

राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२२ लातूर जिल्ह्यात ५६४० विद्यार्थी परीक्षा देणार

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२२ जिल्ह्यातील १३ उपकेंद्रावर होणार असून या परीक्षेसाठी ५ हजार ६४० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी ४०० अधिकारी, कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२२ ही परीक्षा रविवार, दि. २१ ऑगस्ट रोजी या दोन सत्रामध्ये होणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले
आहे.

राजर्षी शाहू विज्ञान, कला महाविद्यालय, बसस्थानकासमोर, लातूर येथे परीक्षार्थी संख्या -४८०, श्री देशिकेंद्र विद्यालय, सिंग्नल कँम्प, लातूर येथे परीक्षार्थी संख्या -४८०, यशवंत विद्यालय, लातूर येथे परीक्षार्थी संख्या -४८०, जिजामाता कन्या प्रशाला नांदेड रोड लातूर येथे परीक्षार्थी संख्या ४८०, सरस्वती विद्यालय खाडगांव रोड प्रकाश नगर लातूर येथे परीक्षार्थी संख्या -४८०, श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय ( सायन्स), सरस्वती कॉलनी, लातूर येथे परीक्षार्थी संख्या -४८०, श्री गोदावरी लाहोटी कन्या विद्यालय दयाराम रोड लातूर येथे परीक्षार्थी संख्या -४५६, ज्ञानेश्वर विद्यालय शाहू चौक न्ाांंदेड रोड लातूर येथे परीक्षार्थी संख्या -३८४, दयानंद विज्ञान महाविद्यालय बार्शी रोड लातूर येथे परीक्षार्थी संख्या -३८४, श्री व्यंकटेश विद्यालय ंिझगणअप्पा गल्ली अग्रसेन भवन जवळ लातूर येथे परीक्षार्थी संख्या- ३८४, श्री सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय खाडगांव रोड लातूर येथे परीक्षार्थी संख्या -३८४, श्री मारवाडी राजस्थान विद्यालय सिंग्नल कँम्प लातूर येथे परीक्षार्थी संख्या -२८८, श्री केशवराज विद्यालय शाम नगर लातूर येथे परीक्षार्थी संख्या-४८० असे एकूण ५ हजार ६४० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. प्रत्येक केंद्रावर बंदोबस्तासाठी पोलीस लावण्यात आल्याची माहितीही निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या