24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरराज्यस्तरीय बॉक्स्ािंग स्पर्धेत मुंबई उपनगरला विजेतेपद पुणे संघ उपविजेता

राज्यस्तरीय बॉक्स्ािंग स्पर्धेत मुंबई उपनगरला विजेतेपद पुणे संघ उपविजेता

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसा च्या निमित्ताने श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय व लातूर शहर बॉंिक्सग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथील क्रीडा संकुलात ७९ वी राज्यस्तरीय युथ मुलांची बॉंिक्सग स्पर्धा घेण्यात आल्या १८ एप्रिल ते २१ एप्रिल पर्यंत झालेल्या स्पर्धेत राज्यातून ३० जिल्ह्यातून १५३ खेळाडूंनी सहभाग नोंदवत अंतिम स्पर्धेत मुंबई उपनगर व पुणे यांच्यात अटीतटीचा सामना होऊन त्यात विजेतेपद सर्वसाधारण मुंबई उपनगर ने तर उपविजेतेदावर पूणे तर तृतीय स्थानी सातारा ने पटकावले दरम्यान स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बॉक्सर म्हणून सातारा येथील ओम कदम बहुमान पटकवला आहे.

बॉंिक्सग स्पर्धेत विजेत्यांना गुरुवारी २१ एप्रिल रोजी सायंकाळी सोहळ्यात प्रमुख अतिथी रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगनाथ लकडे, रेणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे, ऑलमपियन कॅप्टन शाहुराव बिराजदार, पत्रकार हारिराम कुलकर्णी, रेणा साखर कारखान्याचे संचालक प्रवीण पाटील यांच्या हस्ते प्रत्येक वजन गटाच्या सुवर्णपदक विजेत्यांना ७ हजार रुपये व रौप्य पदक विजेत्याला ४ हजार रुपये, काष्य पदक विजेत्यांना बक्षीस व पदक देवुन त्यांचा गौरव करण्यात आला
.
या स्पर्धेसाठी रेणा साखर कारखाना, मांजरा, जागृती शुगर कारखान्याचे विशेष सहकार्य लाभले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुशीलादेवी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. अजय पाटील, प्रा. देशमुख, संपत साळुंखे, प्रा. बनसोडे, भास्कर रेड्डी, प्रा. करजगी, प्रा. लोंढे यांनी परिश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या