26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूरराष्ट्रीय महामार्ग लातूर शहराच्या बाहेरुन काढावा

राष्ट्रीय महामार्ग लातूर शहराच्या बाहेरुन काढावा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ रत्नागिरी-नागपूर जातो आहे. हा मार्ग लातूर शहराच्या दक्षिण व पुर्व भागाकडून काही दिवसांपुर्वी शासनाने लातूर शहरासाठी प्रस्ताविक केलेला बा रस्ता पेठ-चांडेश्वर-कव्हा-शिरसी-बाभळगाव-सोनवती-भातखेडा असा आहे. तसेच बा रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रियासुद्धा सुरु झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावरुन प्रामुख्याने अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रत्नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग लातूर शहरातून जाण्याऐवजी तो पेठ ते भातखेडा या मार्गाने काढण्यात यावा ही व इतर मागण्याचे निवेदन नागरीक कृती समिती व जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. उदय गवारे यांनी दिली.

लातूर जिल्ह्यात महामार्गाचे जाळे विणण्यासाठी जिल्ह्यातील महत्वाचे रस्ते यांचे काम होणे अत्यंत गरजेचे आहे. यातील काही मार्ग शासनाने मंजुर केले आहेत. परळी-अक्कलकोट : परळी-अक्कलकोट हा मार्ग परळी, अंबाजोगाई, तांदुळजा, मुरुड, लोहारा मार्ग अक्कलकोट असून या परिसरातील भाविकांसाठी तसेच नागरीकांसाठी काँक्रीट मार्ग होणे आवश्यक आहे. बाभळगाव-भालकी : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना जोडणारा अत्यंत महत्वपूर्ण रस्ता म्हणजे लातूर-बाभळगाव-बोरी, शिरुर अनंतपाळ-वलांडी-म्हेकर मार्ग रस्ता काँक्रीट करण्यात यावा. तुरोरी-गंगाखेड : पुणे-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गास जोडणारा तुरोरी (कासारशिरसी) निलंगा-उजेड-नळेगाव-किनगाव मार्ग गंगाखेड हा रस्ता काँक्रीटचा करण्यात यावा. चाकुर-मुक्रमाबाद : चाकुर-वाढवणा-बा-हाळी मार्ग मुक्रमाबाद हा रस्ता लातूर व नांदेड जिल् ंना जोडणारा महत्वाचा आहे. औसा-मोहोळ : लातूर जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा एक महत्वपूर्ण रस्ता म्हणजे औसा (बोरफळ) शिवली-उस्माप्नाबाद-वैराग-मोहोळ हा महत्वाचा रस्ता आहे.

चिंचोलीराववाडी-अक्कलकोट : चिचोरीराववाडी (मांजरा साखर कारखाना) आलमला-औसा-नागरसोगा-माकणी-सास्तूर-मुरुम मार्गे अक्कलकोट. रेणापूर-परळी : रेणापूर-पानगाव-परळी हा मार्ग अतिश्य महत्वाचा आहे. रेणापूर-गंगाखेड : लातूर-बीड या जिल्ह्यांना जोडणारा तसेच लातूर आणि बीड जिल्ह्याला जोडणारा जवळचा रेणापूर-पानगाव-किनगाव-गंगाखेड. लातूर-लामजना : लातूर येथून प्रामुख्याने उमरगा, निलंगा जाण्यासाठी औसा मार्ग महामार्ग या मार्गाने जावे लागते. वाढती वाहतूक आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी लातूर-हासेगाव-अपचुंदा-लामजना हा २८ कि. मी. चा मार्ग महत्वाचा आहे. हे सर्व मार्ग सिमेंट काँक्रीटचे होणे आवश्यक आहे.

उपरोक्त मार्ग सिमेंट कॉक्रीटचे करावेत, या मागणीचे निवेदन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. उदय गवारे, बसवंत भरडे, अ‍ॅड. विजय जाधव, महेश गुंडे, प्रा. दत्ता सोमवंशी, सतिश देशमुख, अ‍ॅड. सुशिल सोमवंशी, राहूल गाढवे, शिवाजी सुरवसे, धर्मराज पाटील, प्रताप भोसले, राजकुमार होळीकर, संजय मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या