26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeलातूररेणापूर तालुका परिवर्तन कृती समितीची धरणे

रेणापूर तालुका परिवर्तन कृती समितीची धरणे

एकमत ऑनलाईन

रेणापूर : तालुक्यातील विविध गावांतील मागासवर्गीय समाजाच्या विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. प्रलंबीत प्रश्नांची दखल घेऊन प्रशासनाकडून निराकरण व्हावे या करिता रेणापूर तालुका परिवर्तन कृती समितीच्या वतीने सोमवारी ( दि.११ ) रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले

रेणापुर तालुक्यातील मागासवर्गीय समुहांचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रना चालढकल करीत आहे. सर्व नियमांना फाटा देऊन दलालांच्या माध्यमातून लाचखोरी करूनमोजक्याच लोकांचे कामे केली जात आहेत. सर्व सामाण्यांना मात्र हेलपाटेच मारावे लागतात त्याला न्याय द्यायला कोणीही पुढे येत नाही. सर्व सामान्याचे व गावो गावात मागासवर्गीय समाजाच्या वस्तीत असलेल्या समस्या सोडविण्याकरिता तालुक्यातील विविध पक्ष संघटनांत काम करणा-या कार्यकर्त्यांनी एकत्र येत रेणापूर तालुका परिवर्तन कृती समिती स्थापन करून रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेच्या आनुदानात ग्रामीण करिता असलेले एक लाख वीस हजारा वरून अडीच लाख व शहरी भागाकरिता पाच लाख अशी वाढ करावी व शासनाने पाच ब्रास वाळू शासकीय दरात उपलब्ध करून द्यावी, निराधार व ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजना लागु असतांना एकवीस हजारांची उत्पन्न अट तात्काळ रद्द करावी.

रोजगार हमीची कामे मजुरामार्फतच करावे. संगांयो,श्रावणबाळ योजनेच्या अनुदानात वाढ करावी. गेल्या अनेक वर्षापासुन सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून कुंटूबाचा उदरनिर्वाह करणा-या मागासवर्गीय आतिक्रमण धारक गायरान जमिनीचे पंचनामे करून त्यांचे नावे कबाले द्यावे आदी विविध मागण्यासाठी ही धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नागनाथ चव्हाण, मारोती गायकवाड,उत्तम घोडके, विशाल कांबळे, धम्मानंद घोडके,अजय चक्रे, कमलाकर चिकटे,महादेव कांबळे,माधव साळवे,विष्णू आचार्य,आकाश चव्हाण,किशोर कसबे यांनी अंदोलकांना मार्गदर्शन केले. शाहीर धम्मपाल सावंत, शाहीर मधुकर, बालीका चिकटे यांनी क्रांतीकारी गीत गाऊन शासनावर हल्लाबोल केला. तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांना समितीच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रास्ताविक व आभार समितीचे निमंत्रक विष्णु आचार्य यांनी केले. यावेळी तालुक्यातील साडेतीनशे ते चारशे महिला-पुरुष धरणे आंदोलनात उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या