29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूररोहित स्वामी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सर्वतृतीय

रोहित स्वामी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सर्वतृतीय

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजकार्य विभागातील तृतीय वर्गात शिकत असलेला विद्यार्थी रोहित स्वामी यास देशभक्ती व राष्ट्रनिर्माण या विषयावर आयोजित तालुकास्तरीय भाषण स्पर्धेत सर्वतृतीय येऊन, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.

नेहरू युवा केंद्र संघटन लातूर व राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या वतीने दि. २९ नोव्हेंबर रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तालुका पातळीवर अनेक महाविद्यालयातील स्पर्धकांनी यात सहभाग नोंदविला होता. त्यांच्या या यशाबद्दल महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुनील मिटकरी यांच्या हस्ते रोहित स्वामी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे व समाजकार्य विभाग प्रमुख डॉ. दिनेश मौने, डॉ. डी. आर. बिराजदार, प्रा. डॉ. सदाशिव दंदे, डॉ. रत्नाकर बेडगे व विद्यार्थी कार्तिक उफाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या विद्यार्थ्यांस स्पर्धेकरिता समाजकार्य विभाग प्रमुख डॉ. दिनेश मौने व डॉ. सदाशिव दंदे यांनी मार्गदर्शन केले.

त्याच्या या यशाबद्दल महात्मा बसवेश्वर शिक्षणसंस्थेचे सर्व पदाधिकारी प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे व समाजकार्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिनेश मौने, प्रा. के. य.ू पवार, डॉ. संजय गवई, प्रा. आशिष स्वामी, प्रा. दत्ता करंडे, प्रा. नागेश जाधव, प्रा. प्रकाश राठोड याच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनींनी त्यांचे कौतुक केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या