23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूररोटरी क्लब ऑफ चाकूरचा पदग्रहण सोहळा

रोटरी क्लब ऑफ चाकूरचा पदग्रहण सोहळा

एकमत ऑनलाईन

चाकूर : शहरासह तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून काम करणारी आंतरराष्ट्रीय संघटना असलेली रोटरी क्लब ऑफ चाकूरच्या यावर्षीच्या अध्यक्षपदी चाकूर येथील व्यापारी नारायण बेजगमवार तर सचिवपदी सागर रेचवाडे यांची निवड करण्यात आली असून या दोन्ही नूतन अध्यक्ष व सचिव यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. आर्यवैश्य महासभा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, माजी प्रांतपाल डॉ.ओमप्रकाश मोतीपवळे, उपप्रांतपाल पुरुषोत्तम दरक, सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष शिवदर्शन स्वामी, सचिव संगमेश्वर जनगावे यांनी नुतन अध्यक्ष नारायण बेजगमवार, सचिव सागर रेचवाडे यांच्याकडे सन २०२२-२३ साठी रोटरी क्लब ऑफ चाकूरची सनद, हमर, बेल, कॉलर यांच्यासह जबाबदारी सोपवली.

पदगृहण सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रशांत शेटे यांनी संपादित केलेले रोटरीचे मुखपत्र ‘संकल्प’ चे प्रकाशन करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन डॉ.राजेश तगडपल्लेवर, संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर चाकूरकर यांनी केले.तालुका खरेदी वक्रिी संघाचे चेअरमन डॉ.चंद्रप्रकाश नागिमे, जेष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश वलसे, चेअरमन डॉ.गोंविदराव माकणे, संघर्ष समितीचे अध्यक्ष सुधाकर लोहारे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुभाष काटे, नगरसेवक अभिमन्यू धोंडगे, अ‍ॅड. युवराज पाटील, शैलेश पाटील,डॉ.सतीश कदम, पञकार अ.ना.शिंदे, सुधाकर हेमनर, सलीम तांबोळी, मधुकर कांबळे, विनोद निला, संगमेश्वर जनगावे, संजय पाटील,नगरसेवक साईप्रसाद हिप्पाळे, चंद्रशेखर मुळे, माजी उपसरपंच मुर्तुजा सय्यद, सिद्धेश्वर अंकलकोटे, खदीर शेख, अ‍ॅड. भिमाशंकर नंदागवळे, प्रकाश तेलंग, मल्लिकार्जुन हराळे आदी. इनर व्हिल क्लबच्या लक्ष्मीबाई काटे, डॉ.अंजली स्वामी,उषा महांिलगे, सुनिता फुलारी, जिजाबाई माने,लिलाबाई शिंदे सर्व सदस्य उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या