23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरलखमापूर येथे पीक नुकसान न झाल्याचे पंचनामे

लखमापूर येथे पीक नुकसान न झाल्याचे पंचनामे

एकमत ऑनलाईन

रेणापूर : तालुक्यातील लखमापूर येथील तलाठी यानी गावात न येताच पिकांचे नुकसान झाले नसल्याचा पंचनामा केला. गोगल गाय व अतिवृष्टीमुळे या भागातील शेतक-यांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतक-यांंचा पंचनामा करावा, अशी मागणी लखमापूर येथील शेतक-यांच्या वतीने तहसिलदारांना निवेदनाद्वारे दिली आहे. लखमापूर येथील तलाठी महेश साळुंके हे गावात येत नसल्याने शेतकरी, विद्यार्थी, वयोवृद्ध नागरीकांची अगोदरच गैरसोय होत आहे. याबाबत तलाठ्याच्या विरोधात तक्रार देऊनही अद्यापपर्यंत कार्यवाही झाली नाही.

जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने लखमापूर येथील शेतक-यांनी पेरणी केली. पीक जसे जोमात येत असताना
काही शेतक-यांच्या शेतात गोगलगायींचा पाऊस झाल्याने सोयाबीन व अन्य पिकांचे नुकसान झाल्याने काही शेतक-यांनी दुबार पेरणी केली. त्यातच जुलै महिन्यात तालुक्यात व आमच्या गावात अतिवृष्टीमुळे अनेक शेतक-यांच्या शेतात पाणी साठले यामुळे अनेक पिके पिवळे पडून जळून गेले आहेत तरीही गावाचे तलाठी गावात न येताच नुकसान झाले नसल्याचा पंचनामा करून वरिष्ठाकडे पाठवला आहे. तेव्हा चुकीच्या पध्दतीने पंचनामा करणा-या तलाठ्यावर योग्य ती कार्यवाही करावी आणि नुकसान झालेल्या शेतक-यांचा पुन्हा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतक-यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात कार्यवाही न केल्यास शेतक-यांना सोबत घेऊन तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनात दिला आहे. या निवेदनावर चेरअमन खाडप, व्हाईस चेअरमन संतोष धायगुडे,बाळासाहेब धायगुडे, कल्याण खाडप, उपसरपंच महेश खाडप, नेताजी खाडप, राजेभाऊ खाडप, नानासाहेब खाडप, नेताजी राठोड, अंगद धायगुडे,
हरिभाऊ धायगुडे, चंद्रकांत खाडप, महादेव खाडप, कृष्णा माने, सिद्राम इंगळे,
चंद्रकांत धायगुडे, अरुण धायगुडे, ओम खाडप, दिपक खाडप, लक्ष्मण भिसे यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या