22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरलातुरात ६ अनाथ, दिव्यांग जोडप्यांचा विवाह थाटात

लातुरात ६ अनाथ, दिव्यांग जोडप्यांचा विवाह थाटात

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूरच्या भारतीय अंधजन शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या वतीने २४ जून २०२२ रोजी येथील सिद्धेश्वर मंदिराजवळील श्री सिद्धेश्वर मंगल कार्यालयात समाजातील सहा अनाथ व दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळ्यात थाटात विवाह लावून देण्यात आला. औदार्यपूर्वक स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे समाजातील सर्व घटकांकडून कौतुक केले जात आहे.

समाजाच्या तळागाळातील आणि दुर्लक्षित घटकांपैकी एक असलेल्या अनाथ व दिव्यांग या घटकाकडे आजपर्यंत कोणीही लक्ष न दिल्यामुळे त्यांच्यातील काही जोडप्यांचे विवाह प्रलंबित होते. या बाबीकडे जाणिवपूर्वक लक्ष देऊन त्यांचा विवाह लावण्यात आला. अनाथ, दिव्यांगाची ही व्यथा पाहुन भारतीय अंधजन शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष तसेच सामाजिक, कार्यकर्ते, पत्रकारांनी सामाजिक जाणीवेतून एकत्र येऊन शुक्रवारी, २४ जून रोजी सहा अनाथ दिव्यांग जोडप्यांचा विवाह सोहळा थाटात लाऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. अतिशय भावनिक आणि हृदय स्पर्शी असा ठरलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव प्रा. प्रेरणा होनराव, मुरलीधर चेंगटे, चिंचोले, पंडित हणमंते, शिवानंद पटने, संजय उदारे, नितीन भाले, लिंबराज पन्हाळकर, शरद पवार, काँग्रेसचे ऍड. देवीदास बोरूळे या मान्यवरांसह इतर सामाजिक कार्यकर्ते व वधू वरांचे माता/ पिता व अन्य नातेवाईक उपस्थित होते.

या विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी भारतीय अंधजन शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे तसेच विजयकुमार कांबळे मित्रमंडळ, लोहारा, ता. उदगीर, कुमारस्वामी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, सूर्योदश बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, दंडमअण्णा मित्रमंडळ, नृसिंह अण्णा मित्रमंडळ, उदगीर आणि आरटीआय कार्यकर्ता मंच आदी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांंनी परिश्रम घेतले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या