18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeलातूरलातूर जिल्हा प्रशासनाने सतर्क राहुन नव्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे

लातूर जिल्हा प्रशासनाने सतर्क राहुन नव्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
कोरोनाचा डेल्टा पेक्षा घातक ओमीक्रॉन व्हेरीएंट दक्षिण आफ्रिकेसह इतर काही देशात सापडला असून या पार्श्वभुमिवर महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. लातूर जिल्हा प्रशासनानेही अत्यंत दक्ष राहून या संदर्भाने जाहीर करण्यात आलेले मार्गदर्शक सूचनाचे काटेकोर पालन करावे, जिल्ह्यात या प्रकारतील व्हेरीएंटचा शिरकाव होणार नाही यादृष्टीने उपाययोजना आखाव्यात, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

दक्षिण आफ्रिकेसह जगातील इतर काही देशामध्ये कोरोनाचा घातक ओमीक्रॉन व्हेरीएंट आढळल्याच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रात विशेष काळजी घेण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोररात यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. या संदर्भाने गठीत असलेल्या टास्क फोर्सने नव्याने काही माग्रदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन होण्याच्या संदर्भाने लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून निर्देश दिले आहेत. अलीकडच्या काळात बाहेर देशातून लातूर जिल्ह्यात कोणी प्रवासी आले असतील त्यांची माहिती जमा करावी, त्या प्रवाशांनी प्रवास केलेल्या देशासंदर्भात माहिती घ्यावी, या प्रवाशांमध्ये ताप, सर्दी, खोकला अशी लक्षण असल्यास तातडीने त्यांची आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी, बाहेर देशातून नव्याने जिल्ह्यात येणा-या नागरिकावर लक्ष ठेवावे, त्यांची आवश्यकतेनुसार तपासणी करावी. त्यांना विलगीकरणात ठेवण्याबाबत निर्णय घ्यावा, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेला गती दयावी. लस न घेणा-या नागरिकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करावे. १८ ते २० वयोगटातील तरुणांचे लसीकरण करण्यावर भर द्यावा, शाळा महाविद्यालय सुरू होत आहेत. त्याठिकाणी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखाव्यात आदी सूचना या पत्रातून करण्यात आल्या आहेत.

गर्दीत जाणे, प्रवास करणे टाळावे. नव्या ओमीक्रॉन व्हेरीएंटमुळे संभाव्या तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेऊन यासर्व ठिकाणी कोवीड१९ मार्गदर्शक सुचनांचे कटाक्षाने पालन होणे गरजेचे आहे. कोणत्याच ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. या संदर्भाने प्रशासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. शारीरीक आंतर पाळणे, मास्कचा वापर आणि सॅनिटायझरचा वापर करणे या बाबतीत जनतेने विशेष दक्षता बाळगणे गरजेचे आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, शक्यतो गर्दीतील संपर्क टाळावा, वृध्द आणि ज्येष्ठ नागरिक, लहान मुले घरीच राहतील यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी असे आवाहनही पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

ओमीक्रॉनमुळे कोरोनाची सभाव्य तिसरी लाट येईल ही शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात सर्वांना वेळेत चांगले उपचार मिळावेत यासाठी जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व इतर रुग्णालयाच्या ठिकाणी वाढीव बेड, औषधे, उपकरणे उपलब्ध करुन ठेवलेले आहेत, ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर याची कमतरता भासणार नाही याचे नियोजन करुन ठेवलेले आहे. या नियोजनाची फेरतपासणी करुन सर्व यंत्रणांना सतर्क करावे, असे निर्देश देणारे पत्र पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी .पी., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक निखील पिगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा शल्यचिकीत्सक लक्ष्मण देशमुख यांना पाठविले आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या