लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी सभा, संमेलने, कार्यक्रमावर नियंत्रण ठेवावे, बाधित रूग्णांची माहिती अदययावत ठेवावी, विलगीकरणातील रूग्णांना घरपोच उपचार कीट दयावेत, सर्व अदययावत सुविधासह कोवीड केअर सेंटर सुरू करावेत, औषधे व उपचार साधनाचा पूरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा, आवश्यक डॉक्टर्स व कर्मचारी यांच्या तातडीने नियुक्ती करावी आदी निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व
सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
कोरोना बाधित रूग्ण संख्येत अत्यंत वेगाने होत असलेली वाढ आणि यातून निर्माण झालेली तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेता मंगळवार दि. ११ जानेवारी २२ रोजी दूपारी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अधिका-या समवेत
दूरदृश्य प्रणालीव्दारे बैठक घेऊन राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार सुविधांचा आढावा घेतला.
यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी, जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, अधिष्ठाता डॉ.सुधिर देशमुख, जिल्हाशल्य चिकीत्सक लक्ष्मणराव देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, नगरपरीषद प्रशासन अधिकारी सतिश शिवणे तसेच जिल्हातील सर्व तहसीलदार, नगरपरीषदा व नगरपंचांयतींचे मुख्यअधिकारी, सर्व तालुका वैदयकीय अधिकारी, प्रमुख् वैदयकीय अधिकारी आदी बैठकीत सहभागी झाले होते.
बैठकीच्या प्रारंभी पालकमंत्री देशमुख यांनी जिल्हातील तालुकानिहाय सदयस्थितीचा आढावा घेतला. उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती करून घेतली त्यानंतर कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर उपयायोजना राबविण्याचे निर्देश दिले. कोरोना बाधित रूगणांना योग्य उपचार वेळेत उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सुचाना दिल्या.
बाधित रूग्णांची अदययावत माहिती ठेवावी, गृहविलगीकरणाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, विलगीकरणातील रूग्णांसाठी उपचार कीट घरपोच दयावेत, कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तिची नव्या नियमानुसार तपासणी करावी त्याच बरोबर सर्व अदययावत सुविधासह कोवीड केअर सेंटर सुरू करावेत, रूग्णालयातील अतिदक्षता विभाग सुसज्ज ठेवावेत, ज्येष्ठ व्यक्ती व लहान मुलांसाठी स्वतंत्र उपचार कक्ष निर्माण करावीत, औषधे व उपचार साधनाचा पूरेसा
साठा उपलब्ध करून ठेवावा, आवश्यक डॉक्टर्स व कर्मचारी यांच्या तातडीने नियुक्ती करावी, ऑक्सीजन निर्मीतीचे अपूर्ण प्रकल्पाचे त्वरीत पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
सदया लातूर जिल्हयात चार नगर पंचायतीमध्ये काही प्रभागात निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या ठिकाणी मोठया प्रचार सभा घेतल्या जावू नयेत, नियमानुसार संख्येच्या मर्यादेत ज्या बेठका होत आहेत त्या ठिकाणीही संबंधित अधिकारी यांनी लक्ष ठेऊन कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सुचनांचे उल्ल्घन होणार नाही यांची दक्षता घ्यावी, अश्या सुचनाही पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी दिल्या आहेत.
बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी सर्व अधिकारी यांनी दक्ष राहून आपल्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमीत कमी राहील यादृष्टीने प्रसत्न करण्याच्या सुचना दिल्या. सर्व कोवीड सेंटर व आरोग्य केंद्र, रूग्णालये सुसज्ज ठेकवावीत असे सांगून या व्यवस्था पाहण्यासाठी आपण उद्यापासून जिल्हाभरात अचानक भेटी करणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी म्हटले आहे.