लातूर : जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत ११.०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २५३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात दि. १२ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत. लातूर -९.९ (२११.६) मि.मी., औसा- ८.७ (१४०.६) मि.मी., अहमदपूर- १६ (३५९.७) मि.मी., निलंगा – १०.७ (१६९.३) मि.मी, उदगीर- ९.३ (२४७.०) मि.मी, चाकूर-१३.७ (३१७.६), रेणापूर-११.२ (२४३.३), रेणापूर-११.२ (२४३.३), देवणी – १२.० (२६४.३), शिरुर अनंतपाळ -१२.७ (३१२.२), जळकोट-१३.५ (३४९.२), पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २५३.४ मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
मांजरा, तेरणा व तावरजा नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा
मांजरा, तेरणा व तावरजा नदीवरील बराज, को. प. बंधारेच्या पाणलोट क्षेत्रात येवा सुरु असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पर्जन्यवृष्टी राहून येवा प्रकल्पात येणारा येवा असाच राहीला तर प्रकल्प केंव्हाही निर्धारित पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर प्रकल्पात येणारा येवा मांजरा, तेरणा व तावरजा नदीमार्गे सोडावा लागणार आहे. मांजरा, तेरणा व तावरजा नदीकाठावरील शेतकरीकिंवा नदीकाठी वस्ती करुन राहीलेले नागरिक यांना सावधानतेचा इशारा लातूर पाटबंधारे विभाग क्र. 1 लातूरचे कार्यकारी अभियंता रो. सु. जगताप यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.